Satara News | कुर्दुवाडी शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव; नागरिक त्रस्त
सराफ कट्ट्यात मोकाट जनावरांचा धुडगूस;
कुर्दुवाडी ( शिरीषकुमार महामुनी ) - शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कुर्दुवाडी नगरपालिका याकडे कायम दुर्लक्ष करीत आली आहे. नागरिकांनी समाजमाध्यमावर किंवा प्रत्यक्ष तक्रारी केल्या की प्रशासन केवळ एक रिक्षा फिरवून मोकाट म्हणवल्या जाणाऱ्या जनावरांच्या मालकांना आवाहन करते. मात्र प्रत्यक्षात कोणतीच कुती न करता या रिक्षाच्या माध्यमातूनही आपले उखळ पांढरे करुन घेत आहेत.
मोकाट जनावरांमुळे अनेकदा अपघात झाले आहेत.
सोमवार, ९ मार्च रोजी सराफ कट्ट्यामध्ये मोकाट जनावरांनी धुडगूस घातला. यामध्ये सराफ कट्ट्यातील व्यापाऱ्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. याभागात सराफ बाजार, शाळा, बैंक, दवाखाने व कार्यालये असल्यामुळे लोकांची कुर्जुवाडी रस्त्यावर घुडगूस घालत असताना मोठी वर्दळ असते. मात्र दुचाकीचे पाच ते सहा हजारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शहरात सर्वच प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात फिरताना व सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली जनावरे, रस्त्यावर ठाण मांडून बसलेली पाहायला मिळतात. अनेकवेळा मोकाट जनावरांच्या मारामारी भर रस्त्यात सुरू असतात. यामुळे याचा पादचारी आणि वाहनधारकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असून जीव मुठीत धरुन बाजारपेठेतून प्रमुख रस्त्यावरुन नगर परिषद कुईवाडी वावरावे लागत आहे.
प्रशासन आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली यावर कारवाई करु शकते. मात्र ही मोकाट म्हणवली जाणारी जनावरे हे येथील प्रतिष्ठित लोकांची असल्यामुळे कारवाईसाठी कोणी धजावत नाही. तक्रारी वाढताच केवळ वर्षानुवर्षे रिक्षा फिरवून एखाद खोंड पकडून कारवाईचा फार्स करायचा हे नेहमीचेच झाल्याचे नागरिक बोलत आहेत.प्रशासनच कारवाईसाठी बोटचेपी धोरणअवलंबत असल्यामुळे सामान्य नागरिकांनान्याय कसा मिळणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत. मोकाट जनावरांची संख्या मोठी असल्याने परिसरात भीतीचे वातावरणआहे. मोकाट जनावरांची शहरात दहशत निर्माण होत असून या जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे.
उपाययोजना अंमलात आणावी
मोकाट जनावरे भर बाजारपेठेतून धावत सुटतात. यामुळे अनेकदा अपघात झाले आहेत. अनेकवेळा गाड्यांचे नुकसानही झाले आहे. याचे नुकसान कोण भरून देणार? प्रशासनाने केवळ दवंडी देऊन उपयोग नाही तर प्रत्यक्ष कृतीतून उपाययोजना अंमलात आणणे गरजेचे आहे. - दर्शन देवी, व्यापारी
मिटिंग झाली की होऊन जाईल सगळं
मोकाट जनावरांबाबत अजून ठरावाची मिटिंगच होईना, मिटिंग झाली की होऊन जाईल सगळं बघू जूनं जे टेंडर आहेना त्यालाच मुदत वाढ द्यावं म्हणतोय आता. कारण काय झालंय जुना ठेकेदारपण काम करायला नको म्हणतोय आता. त्यामुळे अडचण व्हायला लागली. तो जर म्हणला असताना काम करतो आपल्याला अडचणच आली नसती. तरीपण कायमच्या कर्मचाऱ्यावर जेवढं होईल तेवढे करतो. - शिवदास अलाट, आरोग्य निरीक्षक नगरपालिका, कुईवाडी