स्ट्रेंजर थिंग्स 5 चा ट्रेलर प्रदर्शित
स्ट्रेंजर थिंग्स ओटीटीवरील सर्वात पसंतीच्या वेबसीरिजपैकी एक आहे. आतापर्यंतचे याचे 4 सीझन आले असून मागील 3 वर्षांपासून याच्या पाचव्य आणि अखेरच्या सीझनची प्रतीक्षा केली जात आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्स सीझन 5’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या पाचव्या सीझनचा ट्रेलर निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे.
स्ट्रेंजर थिंग्सचा राक्षस वेक्ना मुक्त झाला असून तो जगाला नष्ट करू पाहतोय. इलेवन आणि तिचे मित्र वेक्नाला शोधून त्याला नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु वेक्नाच्या जाळ्यात पुन्हा विल येणार असे ट्रेलरमध्ये दिसून येते. ट्रेलरची सुरुवातच वेक्नाद्वारे होते, जो ‘आता होणार अंताची सुरुवात’ असे म्हणताना दिसून येतो. माइक आणि त्याचे मित्र एका लॅबमध्ये अडकले असून तेथून ते पळून जातात. वेक्नाला शोधण्याची योजना आखतात, दुसरीकडे इलेवन स्वत:च्या शक्तींचा वापर करत वेक्नाला नष्ट करण्याचा प्रयत्नात असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे.