स्ट्रेंजर थिंग्स 5 चा टीझर प्रदर्शित
शरीर स्वत:च तयार करणार हॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट वेबसीरिजमध्ये स्टेंजर्स थिंग्सचे नाव सामील आहे. या सीरिजने मागील 4 सीझनच्या बळावर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आता याच्या पाचव्या सीझनची प्रतीक्षा केली जात आहे. निर्मात्यांनी याचा टीझर सादर करत प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली. अंतिम सीझनचा हा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता दुणावली आहे. स्ट्रेंजर्स थिंग्स सीझन 5 चा पहिला वॉल्यूम 27 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाईल. दुसरा वॉल्यूम 2-26 डिसेंबर तर द फायनल वॉल्यूम 1 जानेवारी 2026 रोजी स्ट्रीम करण्यात येणार आहे. स्ट्रेंजर्स थिंग्सच्या सीझन 5 मध्ये काही नव्या चेहऱ्यांची एंट्री होईल. यात लिंडा हॅमिल्टन, एलेक्स ब्रीक्स, नेल फिशर आणि जॅक कॉनली यांचे नाव सामील आहे. तर मिल्ली बॉबी ब्राउन, गॅटेन मातरज्जो, केल्ब मॅक्लॉघलिन, नूह श्नॅप, सॅडी सिंक, फिन वोल्फहार्ड या कलाकारांनी आधीच स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.