For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुन्हे स्थळांशी संबंधीत अजब काम

06:22 AM May 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
गुन्हे स्थळांशी संबंधीत अजब काम
Advertisement

एक इसम करतो अजब जॉब

Advertisement

एक इसम घरांच्या खिडक्या साफ करण्याचे काम करत होता, दरदिनी 10-12 तास अथक मेहनतीनंतर त्याचा उदरनिर्वाह होऊ शकत होता. परंतु हे काम इतके थकविणारे होते, की त्याचा विवाह जवळपास संपुष्टात आला होता, परंतु योगायोगाने त्याला एक असे काम मिळाले, जे साफसफाईचे होते, परंतु केवळ काही तासांमध्ये त्याला जुन्या जॉबइतकाचा पगार मिळू  लागला.

बेन जाइल्सने स्वत:च्या या विचित्र जॉबचा अनुभव कथन केला आहे. बेन आता हत्येनंतर क्राइम सीनच्या साफसफाईचे काम करतो. मी खिडक्या साफ करण्याचे काम सोडून दिले आहे, आता मी क्राइम सीनवर काम करून एक महिन्याचा पगार केवळ काही तासांमध्ये कमावत आहे, परंतु हे काम कमकुवत हृदय असलेल्या लोकांसाठी नाही असे तो सांगतो.

Advertisement

बेन जाइल्सने खिडकी साफ करणाऱ्यापासून जैव-धोक्याची सफाई करणारा तंत्रज्ञ होण्यापर्यंतच्या स्वत:च्या कारकीर्दीत एक नाट्यामय बदल अनुभवला आहे. आता केवळ काही तासांमध्ये महिन्याइतकी कमाई करत आहे. पैसे भरपूर मिळतात, परंतु हे काम अत्यंत साहसाचे असल्याचे त्याचे सांगणे आहे.

सडलेले शरीर हटविण्याचे काम

जेव्हा मी कामाच्या ठिकाणी पोहोचतो, तेव्हा तेथे काय पहायला मिळेल हे माहित नसते. एका चकित करणाऱ्या घटनेत मला एका घराच्या सफाईसाठी पाठविण्यात आले होते, तेथे एक मृतदेह मिळाला होता, जो 15 वर्षांपासून कुणाच्याच नजरेत आला नव्हता. सांगाड्यात रुपांतरित या मृतदेहाच्या पायांवर चामड्याचा बेल्ट आणि बूट होते असे त्याने सांगितले आहे. जैव-धोक्याची सफाई करणाऱ्याच्या रुपात बेनला स्वत:च्या जीवनात याहून भयानक दृश्यही पहावी लागली आहेत. त्याने स्वत:चे अनुभव कथन करणारे ‘द स्पेशलिस्ट’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.

रक्ताने माखलेल्या घरांची सफाई

एका सामान्य घरात मी सफाईसाठी गेलो होतो, ते एक क्राइम स्पॉट होते, घरात शिरताच ते साफ दिसून आले, कोट हुकवर टांगलेले होते, दरवाजानजीक एका पात्रात चाव्या ठेवण्यात आल्या होत्या, परंतु स्वयंपाकघर पूर्णपणे अस्तव्यस्त होते. घरातील पुरुषाने स्वत:च्या पत्नीची निर्दयीपणे हत्या केली होती असे नंतर कळले. तेथे मोठ्या प्रमाणात रक्त पसरले होते. कपाट, फरशी, भिंती आणि वर्कटॉप, दरवाजाचे हँडल आणि वॉशिंग मशीनमध्येही रक्तच रक्त होते. सर्वत्र रक्ताने माखलेल्या हातांचे ठसे, बोटांच्या खुणा, रक्ताने माखलेल्या वस्तूला हिंसक स्वरुपात फिरविल्याने कोसळलेले रक्ताचे थेंब फैलावले होते असा उल्लेख त्याने पुस्तकात केला आहे.

अखेरच्या क्षणांची कहाणी

बेनला सर्वाधिक हादरवून टाकणारी गोष्ट म्हणजे त्या स्थळाची सामान्यता होती. एक अत्यंत साधारण घरगुती वातावरण अचानक क्रूर हत्यास्थळात रुपांतरित झाले होते. आम्ही जे काही साफ करतो, ते कुठल्या न कुठल्या प्रकारे कहाणी व्यक्त करत असते. अनेकदा कुणाच्या जीवनातील अखेरच्या क्षणांची कहाणी मांडत असते असे बेनचे सांगणे आहे.

अभ्यासक्रमात सहभाग

एका घरमालकाने अलिकडेच एका रिकामी फ्लॅटची सफाई करण्यासाठी बोलाविले होते. भाडेकरू अधिक साफसफाई राखणारा नव्हता असे घरमालकाने सांगितले होते, परंतु बेन या फ्लॅटमध्ये शिरताच बाथटब पूर्णपणे मलमूत्राने भरलेला आढळून आला. हे अत्यंत किळसवाणे काम होते. मग अनेक तासांच्या मेहनतीच्या बदल्यात बेनने 2 हजार पाउंड कमाविले होते. त्या कठिण परीक्षेनंतर बेनने एका अशा अभ्यासक्रमात भाग घेतला, ज्याने त्याला नव्या पेशाच्या मूलभूत गोष्टी शिकविल्या.

हादरविणारे क्राइम स्पॉट

बेन सध्या नियमित स्वरुपात अशा घरांची सफाई करतो, जेथे एखादी भयानक घटना घडलेली असेल किंवा हत्या झालेली असेल. एका इसमाचा मृत्यू झालेल्या घराला त्याने किटाणूरहित केले होते. या इसमाच्या मृत्यूबद्दल 6 आठवड्यांनंतर लोकांना कळले होते. मृताशी संबंधित कायदेशीर प्रतिनिधीने त्याला सफाईचे काम सोपविले होते. घरात इसमाच्या मृतदेहासोबत त्याचा श्वान होता आणि त्याने त्याचा चेहरा आणि पायाचा बहुतांश हिस्सा खाल्ला होता. अशा ठिकाणांना बेन दररोज साफ करतो. अशाप्रकारचे काम भयानक असले तरीही अत्यंत लाभदायक असल्याचे बेनचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.