चालणारा विचित्र वृक्ष
असतात मोठमोठे पाय, पुढे सरकत असतो
आम्ही ज्या पृथ्वीवर राहतो, त्याविषयी सर्वकाही जाणत नाही. तर आपल्याला जे माहित असते, ते फारच कमी असते. जगात एक असा वृक्ष आहे, जो माणसांप्रमाणे चालू शकतो. हा वृक्ष एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतो.
वृक्ष-रोपांमध्ये माणसांप्रमाणेच प्राणतत्व असतात हे सर्वांनाच माहित आहे. याचमुळे त्यांची वाढ होत असते. परंतु एक वृक्ष माणसांप्रमाणे चालू देखील शकतो.निसर्गाची सर्वात रहस्यमय आणि विचित्र रचना म्हणजे कॅसापोना वृक्ष आहे. हा वृक्ष इक्वेडोरच्या दाट उष्णकटिबंधीय वर्षावनात आढळून येतो. ताडाच्या प्रजातीच्या या वृक्षाला ‘धावणारा ताड’ किंवा ‘चालणारा ताड’ असेही म्हटले जाते. तर याचे शास्त्राrय नाव सोक्रेटिया एक्सोर्रिजा आहे. इक्वेडोरच्या घनदाट जंगलांमध्ये सॉइल इरोशनचे प्रमाण अत्यंत अधिक आहे. जंगल घनदाट असल्याने प्रकाश सर्वत्र पोहोचू शकत नाही. अशा स्थितीत रोपाच्या मूळावरील माती सैल झाल्यावर तो मजबूत माती अन् पुरेशा सूर्यप्रकाशाच्या शोधात नव्या मूळांची निर्मिती करतो. नवे मूळ हळूहळू कठोर मातीत पोहोचतात. तर जुनी मूळं मातीतून सुटतात. अशाप्रकारे हा वृक्ष स्वत:च्या जुन्या स्थितीच्या पुढे जात नव्या ठिकाणी जम बसवितो.
स्लोवॉक राज्य संशोधन संस्थेचे वनस्पतीशास्त्रज्ञ पीटर व्रान्स्की यांनी या वृक्षाच्या मूळांच्या माध्यमातून वेग पकडण्याच्या क्षमतेचे रहस्य सर्वांसमोर आणले होते. त्यांच्या संशोधनातून कॅसापोना वृक्ष जिवंत राहण्यासाठी स्वत:ची जागा बदलत राहत असल्याचे समोर आले. परंतु स्थानांतरणाची ही प्रक्रिया अत्यंत मंद आहे. वृक्ष एका दिवसात दोन ते तीन सेंटीमीटरपर्यंतच पुढे सरकू शकतो. एका वृक्षाला पूर्णपणे स्थानांतरित होण्यास जवळपास दोन वर्षांचा कालावधी लागतो. कधीकधी वृक्ष स्वत:च्या मूळ जागेपासून जवळपास 20 मीटरपर्यंत पुढे सरकत असतात.
कॅसापोना वृक्ष निसर्गाचे एक अद्भूत उदाहरण आहे. प्राण्यांप्रमाणेच रोपं देखील जिवंत राहण्यासाठी स्वत:ला अनुकूलित करून घेत असल्याचे यातून सिद्ध होते. वृक्षाचे हे विचित्र वैशिष्ट्या केवळ पर्यावरण तज्ञांसाठी नव्हे तर सर्वसामान्य लोकांसाठी निसर्गाचे एक रहस्य ठरले आहे.