महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

130 वर्षे जुन्या घराखाली सापडल्या अजब वस्तू

06:07 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टाइम कॅप्सूल अन् खास पत्र

Advertisement

अनेकदा एखाद्या जुन्या घराच्या साफसफाईदरम्यान लोकांना असे काहीतरी सापडते जे दंग करून टाकणारे असते. कधी हा खजिना असू शकतो तर कधी आणखीच काहीतरी असू शकते. अलिकडेच एका महिलेला 130 वर्षे जुन्या घरात अशाचप्रकारच्या गोष्टी मिळाल्या आहेत. इंग्लंडच्या विल्टशायरमध्ये स्विंडनच्या मॅडलिन गुडविनला स्वत:च्या घराच्या फरशीखाली एक धातूची टाइम कॅप्सूल सापडली आहे.

Advertisement

जमिनीत एका बॉक्समध्ये जुन्या काळातील स्मृतिचिन्ह सापडली आहेत. यात 1901 मधील एक पैसा, टोपी, सिगारेटचे पाकिट, बायबल, वृत्तपत्र आणि एक पत्र सापडले आहे. आम्ही एक जुने टेबल फेसबुक मार्केटप्लेसवर विकण्यासाठी ठेवले होते. या घरात पूर्वी राहणारी महिला आम्हाला भेटली आणि तिनेच या घराच्या इतिहासाविषयी आम्हाला सांगितले आहे. व्हिक्टोरियन घर 1890 मध्ये तयार करण्यात आले होते. 2007 पर्यंत हे घर संबंधित महिलेच्या परिवाराकडे होते. या परिवाराने टाइम कॅप्सूल इमारतीच्या पायारत फरशीच्या बोर्डखाली ठेवला हेता. तिचा परिवार 2007 मध्ये संपत्ती सोडेपर्यंत कॅप्सूलमध्ये काहीतरी जोडत राहिला होता. याचा शोध नव्या रहिवाशांनी लावावा अशी या महिलेची इच्छा होती असे गुडविन यांनी सांगितले आहे.

गुडविन आणि तिच्या पतीला जिन्यांखालील कपाटाच्या खाली कॅप्सूल मिळाले. आमच्या परिवाराने हे घर आता खरेदी केले असल्याने टाइम कॅप्सूलमध्ये आता आणखी कोणत्या गोष्टी जोडू शकते याचा विचार करत असल्याचे गुडविन यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article