अंत्यसंस्कारावेळी अजब सर्व्हिस
50 हजार रुपयांमध्ये बुकिंग
अमेरिकेत मृत्यूनंतर अंत्यनिरोप स्मरणीय अन् रहस्यमय करण्याची अनोखी सर्व्हिस सुरू झाली आहे. लोक आता महाग दरात एका खास महिलेला बुक करतात, जी अंत्यसंस्कारात येत सर्वांचे लक्ष वेधून घेते. काळ्या कपड्यांमध्ये असलेली ही सुंदर महिला गुपचूपपणे अश्रू ढाळते आणि कुणाला काही न सांगता तेथून निघून जाते.
या सर्व्हिसचे नाव ‘डार्क सीक्रेट’ आहे. य सर्व्हिसमध्ये ही महिला संबंधिताच्या अंत्यसंस्काराला एक कहाणी देऊन जाते. अखेर ही काळ्या कपड्यातील महिला कोण असा प्रश्न लोकांना पडतो. परंतु याचे उत्तर जाणून घेण्यापूर्वीच ही महिला गायब होते.
अंत्यसंस्कार सुरु असतानाच एक ब्लॅक लिमोजीन येते, त्यातून एक आकर्षक आणि रहस्यमय महिला उतरते, ती काळ्या कपड्यांमध्ये असते. काही अंतरावर उभी राहून ती शांत भावनेने अश्रू ढाळत असते. पूर्ण वेळ ती कुणासोबत संभाषण करत नाही, सर्व्हिस संपताच ती गुपचूपपणे तेथून गायब होते. याचा केवळ एकच उद्देश असतो, मृतांच्या नातेवाईक आणि मित्रांच्या मनात प्रश्न निर्माण करणे. ही महिला कोण होती? मृतासोबत तिचे नाते कोणते होते? मृताच्या जीवनात कोणते रहस्य होते का अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित होतात. यामुळे अंत्यसंस्कार साधारण नव्हे तर नेहमी आठवणीत राहणारे रहस्य ठरतात.
आधुनिक काळात लोक स्वत:च्या मृत्यूनंतरही चर्चेत राहू इच्छितात. हयात असताना आपली केवळ कोरड्या शब्दांनी आठवण काढली जाऊ नये अशी लोकांची इच्छा असते. या महिलेमुळे अंत्यसंस्कारावेळी एक वेगळा ड्रामा निर्माण होतो. हे पूर्णपणे प्रोफेशनल पद्धतीने केले जाते. महिलेला प्रथम पूर्ण तपशील पुरविला जातो, परंतु ती कधीच मृताच्या परिवाराशी संपर्क साधत नाही. तिचे काम केवळ अश्रू ढाळणे आणि रहस्य सोडून जाणे असते असे सेवाप्रदात्याचे सांगणे आहे.
जगात यापूर्वीही ‘रेंट ए मॉर्नर’ सेवा उपलब्ध होती. अमेरिका आणि काही युरोपीय देशामंध्sय रेंट अ मॉर्नर सेवा सुरू असून प्रोफेशनल लोक अंत्यसंस्कारात रडणे आणि शोक करण्यासाठी येतात. परंतु डार्क सीक्रेट युक्त ही सेवा त्यापुढील टप्पा असून कारण हे केवळ रडण्यासाठी नव्हे तर रहस्य आणि आकर्षण निर्माण करण्यासाठी आहे.