या व्यक्तीच्या नावावर विचित्र विक्रम
सर्वाधिक गोळ्या लागूनही राहिला होता जिवंत
सद्यकाळात बंदुकीचा वापर जगभरात केला जातो. दहशतवाद्यांपासून सुरक्षा दलांपर्यत बंदूक असते. कारण बंदुकीने कुठल्याही व्यक्तीला सहजपणे मारता येऊ शकते. कुठली बुलेट सर्वात लवकर माणसाला ठार करू शकते हे कुठल्याही बंदुकीवर निर्भर असते. जगभरात दीर्घ अंतरापर्यंत निशाणा साधणाऱ्या बंदुका आहेत. बंदुकांचे अनेक प्रकार असतात. यात पिस्टल, रिव्हॉल्व्हर, शॉटगन, रायफल आणि मशीनगनपर्यंत सामील आहे.
सर्वसाधारण माणूस प्रामुख्याने हँडगन किंवा शॉटगनचा वापर करतो. यातही सर्वाधिक पिस्टल आणि रिव्हॉल्वहरचा वापर केला जातो. पिस्टल हे कमी अंतरापर्यंत गोळी झाडू शकणारी हँडगन असते. यात 10 इंचापेक्षाही छोटा बॅरल असतो. पिस्टल ऑटोमॅटिक, सिंगल शॉट आणि मल्टी चेंबर तीन प्रकारच्या असतात. तर रिव्हॉल्व्हर एक प्रकारचे हँडगन असते, रिव्हॉल्व्हरमध्ये स्विंग आउट, टॉप ब्रेक आणि फिक्स्ड सिलिंडर यासारखे प्रकार असतात.
1995 मध्ये उत्तर कॅरोलिनातील केनी वॉन नावाच्या इसमावर सुमारे 20 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या गोळ्या डोकं अन् हृदयात न शिरल्याने तो वाचू शकला होता. तसेच वाचण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण त्याचा आत्मविश्वास होता, कारण हल्ल्यावेळी गंभीर जखमी होऊनही त्याने डोळे बंद केले नव्हते.
केनी वॉन हा सर्वाधिक गोळ्या लागूनही जिवंत राहणारा इसम ठरला होता. त्याचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. केनी वॉन 20 गोळ्या लागूनही वाचल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते.