पाळीव श्वानावरील अजब प्रेम
श्वानाचा झाला मृत्यू, 19 लाख खर्चात पुन्हा केला जिवंत
या जगातून जो निघून जातो, तो परत येत नाही असे म्हटले जाते. याचमुळे लोक स्वकीयांच्या गमाविण्याचे दु:ख अनेक वर्षे विसरत नाहीत. सद्यकाळात घरात पाळल्या जाणारा प्राण्यांनाही लोक घराचा सदस्य मानतात आणि त्याचा मृत्यू देखील त्यांना मोठा धक्का देत असतो. एका अशाच महिलेची कहाणी सध्या व्हायरल होत असून ती अत्यंत अनोखी आहे.
या महिलेला स्वत:च्या पाळीव प्राण्याबद्दल प्रेम असल्याने त्याचा मृत्यू ती सहन करू शकली नाही. चीनच्या शांघाय येथे राहणाऱ्या महिलेने सुमारे 19 लाख रुपये खर्च करत स्वत:च्या पेट डॉगला पुन्हा जिवंत केले आहे. हे कसे शक्य आहे असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे, हा चमत्कार महिलेने केला कसा यामागे पूर्ण कहाणी आहे.
शांघायच्या हांग्जो येथे राहणाऱ्या जू नावाच्या महिलेने 2011 मध्ये एक डॉबरमॅन श्वान खरेदी केला होता. महिलेने त्याचे नाव जोकर ठेवले आणि त्याच्यावर ती खूप प्रेम करायची. जोकर तिला सुरक्षेची अनुभूती मिळवून देत होतो. दोघांचे नाते अत्यंत अनोखे होते. परंतु जोकरच्या मानेत घातक सार्कोमा विकसित झाला, महिलेने त्याची सर्जरी करविली, ज्याला श्वानाने अत्यंत शूरपणे सहन देखील केले. परंतु 11 वर्षे वयात जोकरला हृदयविकाराचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. यामुळे महिलेला मोठा मानसिक धक्का बसला.
महिलेने हार न मानता तज्ञांच्या सल्ल्यावर स्वत:च्या जोकर श्वानाची क्लोनिंग प्रक्रिया अवलंबिली. क्लोनिंग कंपनीने जोकरचे पोट, कान आणि डोक्यावरील त्वचेचे नुमने मिळविले आणि त्याचा वापर करत एक एम्ब्रायो म्हणजेच भ्रूण तयार केला. याला सरोगेट डॉगमध्ये प्रत्यारोपित करत यावर नजर ठेवण्यात आली. 2024 मध्ये जोकरचा क्लोन तयार झाला, ज्याला लिटिल जोकर नाव देण्यात आले. तो हुबेहुब जोकरप्रमाणे दिसत असल्याचे महिलेचे सांगणे आहे.