मेक्सिकोतील विचित्र प्रथा
थडग्यातून बाहेर काढून मृतदेह साफ करण्याचा प्रकार
मेक्सिकोत पोमुच नावाचे शहर असून येथील लोकसंख्या केवळ 9600 आहे. येथे दरवर्षी एक अशी प्रथा पाळली जाते, जी जगाला हैराण करणारी आहे. येथे डे ऑफ द डेड (मृतांचा दिवस)च्या एक आठवड्यापूर्वी परिवार दफनभूमीत पोहोचतात, थडगी उकरतात आणि मृत स्वकीयांची हाडं बाहेर काढतात. यानंतर उन्हात ठेवून यातील प्रत्येक हाडं ब्रशने साफ केले जाते. मृतदेहावरील शिल्लक केसांनाही झाडले जाते आणि नव्या पांढऱ्या रंगाच्या चादरीत गुंडाळून मृतदेह परत ठेवला जातो. हे दृश्य पोमुच शहरवासीयांसाठी हे भावुक पुनर्मिलन आहे. त्यांना मृतांशी बोलणे, आठवणींना उजाळा आणि त्यांना ‘सुंदर’ करण्याचे प्रेमपूर्ण कर्तव्य वाटते. पोमुचमध्ये मृत्यूला जीवनाचा हिस्सा करत उत्सवाचे स्वरुप दिले जाते. ही प्रथा ‘चू बा’ अक’ (हाडं साफ करणे) नावाने ओळखली जाते. माया संस्कृती आणि पॅथोलिक प्रभावाचे हे अनोखे मिश्रण आहे. पोमुच कॅम्पेचे राज्यातील शहर असून ते प्राचीन माया संस्कृतीचे केंद्र राहिले आहे. शतकांपेक्षा जुनी ही प्रथा मृताच्या स्मृती जिवंत ठेवण्याचे माध्यम आहे. हाडं साफ न केल्यास आत्मा नाराज होत परिवाराला दुर्भाग्याचा सामना करावा लागु शकतो असे स्थानिक मानतात.
भयावह असते दृश्य
मृतदेह बाहेर काढण्याची खास पद्धत असते. एक वर्षापूर्वी दफन करण्यात आलेल्या मृतदेहाला प्रथम बाहेर काढले जाते. मृतदेह जुना असेल तर थेट हाडं निघतात, मग पाणी, साबण आणि ब्रशने त्याची सफाई केली जाते. कवटीची विशेष देखभाल केली जाते. डोळ्यांच्या ख•dयांना साफ केले जाते. केस शिल्लक असल्यास कंगव्याने विंचरले जातात, त्यानंतर हाडांना नव्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळले जाते. मग लाकडी पेटीत ठेवून पुन्हा थडग्यात दफन केले जाते.