विवाहानंतर पार पडते विचित्र प्रथा
विवाह सोहळा हा लोकांना अत्यंत उत्साहित करणारा असतो आणि यातील विधी या सोहळ्याला अधिक खास स्वरुप प्राप्त करून देत असतात. भारतीय विवाह आणि यात होणाऱ्या विधींविषयी लोकांना माहिती असते. परंतु प्रेंच पोलिनेशियाच्या मार्केसस बेटावर विवाहानंतर विचित्र प्रथा पार पडत असते. विवाहानंतर वधूचे नातेवाईक एकमेकांजवळ पहुडावे लागते.
फ्रेंच पोलिनेशियाच्या मार्केसस बेटावर विवाह पार पडल्यावर वधू आणि वराला एक प्रथा पार पाडावी लागते. ही प्रथा अत्यंत अजब आहे. येथे विवाह सोहळा आटोपल्यावर वधूच्या नातेवाईकांना एकमेकांच्या कडेला पहुडावे लागते आणि यादरम्यान ते सरळ झोपत असतात. या पहुडलेल्या नातेवाईकांवर एक काळे कापड टाकले जाते, यामुळे ते मानवी कार्पेट ठरतात. मग या मानवी कार्पेटवरून वधू आणि वराला चालावे लागते. स्वत:च्या नातेवाईकांच्या शरीरावर ते दगड असल्याप्रमाणे वधू आणि वराला चालावे लागते. ही प्रथा अत्यंत विचित्र असली तरी तेथील लोक ती अत्यंत आवडीने पार पाडत असतात. या लोकांना स्वत:च्या प्रथेबद्दल प्रचंड कौतुक देखील आहे.