अजब व्यवसाय... कमावितो पैसा
इतरांच्या गर्लफ्रेंडची पैसे घेऊन काढतो छेड
गर्लफ्रेंडच्या सुरक्षेसाठी कुठलाही विचार न करता पुढे येणारा बॉयफ्रेंड मुलींना आवडत असतो. जे लोक भांडणात काहीसे कमकुवत असतात, त्यांच्यासाठी अशा गर्लफ्रेंडसमोर इम्प्रेशन जमविणे अवघड असते. अशा स्थितीत कुणी तरी आपल्याला हिरो करू शकेल का असा विचार त्यांच्या मनात येतो. अशाच लोकांसाठी मलेशियात एक इसम जणू देवदूतच ठरला आहे.
हे विचित्र असले तरीही मलेशियात ही अनोखी सर्व्हिस सुरू असून याला मागणी देखील आहे. ही सर्व्हिस स्वत:च्या गर्लफ्रेंडच्या नजरेत अल्फा मेल होण्याची इच्छा असलेल्या युवकांसाठी आहे. त्यांच्यासाठी भाडेतत्वावर गुंड येईल, जो निर्धारित पैशांच्या हिशेबानुसार त्यांच्याकडून मार खाईल आणि काही क्षणात त्यांना हिरो करून सोडेल.
मला मारून हिरो व्हा
अशाप्रकारच्या बिझनेस आयडिया आजवर कुणाला सुचली नसेल. संबंधित इसमाला पाहून तुम्ही त्याला गुंड समजाल, परंतु हा त्याच्या कमाईचा स्रोत आहे. मलेशियाच्या इम्पोह येथे राहणारा 28 वर्षीय शाजाली सुलैमानने ‘व्हिलेन फॉर हायर’ सर्व्हिस सुरू केली आहे. रितसर सोशल मीडियावर स्वत:च्या सर्व्हिसचा प्रचार करत शाजालीने माझे ग्राहक जोडीदारासमोर स्वत:चे शौर्य सिद्ध करण्यासाठी माझी मदत घेऊ शकतात असे म्हटले आहे. तुमची प्रेयसी तुम्हाला कमजोर समजते का? स्वस्त दरात मी त्यांना चुकीचे ठरवेन असे शाजालीने स्वत:च्या जाहिरातीत म्हटले आहे.
पोलीस झाले दंग
शाजाली यांना केवळ ठिकाण अन् वेळ सांगावी लागते. मग ते स्वत:च्या गुंडाच्या लुकसोबत येत संबंधिताच्या प्रेयसीची छेड काढण्यास सुरुवात करतात. मग संबंधित प्रियकर स्वत:चे धाडस दाखवत त्यांना तेथून हुसकावून लावतो. शाजाली दिसण्यास एखाद्या गुंडासारखा असल्याने प्रेयसीला यावर विश्वास बसतो. त्यांच्या या सर्व्हिसकरता 100 रिंगिट म्हणजेच 1898 रुपये वीकडेज आणि वीकेंडवर 2700 रुपयांपर्यंत शुल्क आकारतात. जर कुठे दूर जायचे असेल तर हे शुल्क वाढते. हा प्रकार बेकायदेशीर आहे कारण मुलींची छेड काढणे गुन्हा असल्याचे सोशल मीडिया युजर्सनी प्रतिक्रियेदाखल म्हटले आहे.