For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चालकाशिवाय कार न्यूट्रल होऊन एसटीच्या चाकाला धडकली

02:41 PM Feb 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
चालकाशिवाय कार न्यूट्रल होऊन एसटीच्या चाकाला धडकली
Advertisement

सावंतवाडी चिटणीस नाका येथे विचित्र अपघात ; अपघातामुळे वाहतूक कोंडी

Advertisement

सावंतवाडी -

सावंतवाडी शहरात चिटणीस नाका येथे आज बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात घडला. रस्त्याच्या बाजूला पार्किंग केलेली कार अचानक विना चालकाशिवाय न्यूट्रल होऊन समोरून येणाऱ्या एसटी बसच्या मागील चाकाकडे जाऊन धडकली. एसटी चालकाने वेळीच बस थांबवल्याने पुढील अनर्थ टळला. या विचित्र अपघातामुळे शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई - गोवा मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबून वाहतूक कोंडी झाली . या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस हवालदार सुरेश पाटील व महेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी एसटी बस चालक व नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त कार बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. कणकवलीतील एका व्यक्तीने आपली कार चिटणीस नाक्यावरील पूलाच्या बाजूला पार्क करून ते बाजूलाच खाजगी कामासाठी गेले होते. ते गेल्यानंतर काही मिनिटातच ती कार अचानक न्यूट्रल होऊन विना चालकाशिवाय पुढे येत रस्त्यावरून बस स्थानकाकडे येणाऱ्या वेंगुर्ले सावंतवाडी एसटी बसला मागील चाकाच्या बाजूने धडक बसून विचित्र अपघात झाला. अपघातात कारच्या दर्शनी भागाचे किरकोळ नुकसानी झाली तर एसटी बसचेही किरकोळ नुकसान झाले. पोलिसांनी कारचा नंबर वरून मालकाची नाव माहिती व फोन नंबर मिळवून चालकाशी संपर्क साधला. अपघाताबाबत चालकांची कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.