बांदा नट वाचनालयातर्फे कथाकथन स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी
बांदा
नट वाचनालयाने शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून श्री. विष्णु नारायण गांवकर, आडाळी पुरस्कृत (कै.) सौ. विजयालक्ष्मी विष्णु गावकर व (कै.) बिपीन विष्णु गांवकर यांचे स्मरणार्थ कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालयात होणार आहे.
सदर स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित असून इयत्ता तिसरी व चौथी आणि इयत्ता पाचवी ते सातवी अशा दोन शालेय गटात होणार आहे.तिसरी ते चौथी या गटासाठी 'कोणतीही संस्कारक्षम कथा' हा विषय असून वेळ ४ मिनीटे आणि पाचवी ते सातवी गटासाठी 'माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग' हा विषय असून वेळ ५ मिनीटे ठेवण्यात आला आहे. दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकाना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी एका गटात एका शाळेतील फक्त दोनच विद्यार्थी स्विकारले जातील. तरी या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या स्पर्धकांची नावे संबंधित शाळांनी दिनांक ५ डिसेंबर पर्यंत नट वाचनालयात आणून द्यावीत व ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन नट वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.