For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Maharashtra Assembly | "काल 'जोर का झटका' दिल्यामुळे पोराचे मानसिक संतुलन बिघडले!" एकनाथ शिंदेंचे आदित्य ठाकरेंना चोख उत्तर

04:49 PM Jun 23, 2026 IST | NEETA POTDAR
maharashtra assembly     काल  जोर का झटका  दिल्यामुळे पोराचे मानसिक संतुलन बिघडले   एकनाथ शिंदेंचे आदित्य ठाकरेंना चोख उत्तर
Advertisement

मुंबई - सध्या राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झालं असून ते चांगलेच गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ही अधिवेशन चांगलेच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.. अधिवेशनाचा दुसरा दिवस विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कमालीचा वादळी ठरला... यावेळी ठाकरे पक्षाचे आमदार आदित्या ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरत टीकास्त्र डागल्याचे पाहायला मिळाले..

Advertisement

फेकनाथ मिंधे’ उत्तर द्यायला घाबरतात - आदित्य ठाकरे

सभागृहाचे कामकाज चालु असताना आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक भुमिकेत पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्र्यांकडे असलेल्या खात्यांचे प्रश्न उत्तरासाठी दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवले जात असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. कडाडून टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, उपमुख्यमंत्री आपल्या अखत्यारीत असलेले विभाग दुसऱ्या मंत्र्यांकडे सभागृहात उत्तर देण्यासाठी विभागून देतात. जी खाती रडून घेतली, त्या खात्यांबाबत त्यांनी स्वतः उत्तर द्यायला हवे. पण फेकनाथ मिंधे उत्तर द्यायला घाबरतात. जर मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल, तर त्यांनी तसे लेखी लिहून द्यावे.असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला सभागृहातून उत्तर दिले.

Advertisement

ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडले -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सभागृहाचे कामकाज अध्यक्ष तुमच्या आध्यक्षतेखाली चालते, काल जोर का झटका दिल्यामुळे त्यांचे (ठाकरेंचं) मानसिक संतुलन बिघडले आहे. आणखी झटके देणार आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी आणखी ऑपरेशन टायगर होणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच, विजयराव, जयंतराव तुम्ही ज्येष्ठ आहात, काय पोरा टोरांचे ऐकता, असे म्हणत आदित्य यांना डिवचलं. तसेच, सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे ही सरकारची सामूहिक जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.दोघांच्या या कोल्डवॉरमुळे अधिवेशनाचा दुसरा दिवशीचे आक्रमक कमालीचा वादळी ठरले.

Advertisement
Tags :

.