Khanapur storm | खानापूर तालुक्यात वादळी पावसाचा हाहाकार; 'या' एका गावातच झालं सव्वा कोटींचं नुकसान, शेतकरी हवालदिल!
खानापूर तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा
विटा -रविवारी सायंकाळी झालेल्या बादळी पावसाने खानापूर तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. केवळ नागेवाडी येथे बादळी बाऊयासह आलेल्या पावसाने भारती शुगरचे जवळपास सव्वा कोटींचे नुकसान झाले आहे. बादळाने शेतातील उभी पिके पडली असून घराच्या छतावरील पत्रे उडून पडले,तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.
प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. मात्र गावातील तलाठी तालुक्याला आणि कोतवाल बांधावर अशी परिस्थिती असल्याने ग्राम महसूल चा कारभार सध्या कोतवालांच्या हाती आला असल्याचे चित्र आहे.खानापूर तालुक्याच्या उत्तर भागाला रविवारी सायंकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला. सोसाट्याच्या बादळी झयांमुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. जोरदार बाऊयामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळली आहेत.
वीज वितरण कंपनीच्या खांबांवर झाडे पडल्याने तारा तुटल्या आहेत. यामुळे काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाडे बाजूला करून रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू आहे. तर सळशिंगे, देवनगर, लेंगरे, घानवड परिसरात अनेक घरांचे छत उडून गेले भिंतीची पडझड झाली. शेतातील उभी पिके आडवी झाले आहेत. यामुळे शेतक्रयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
वादळामुळे नागेवाडी येथील साखर कारखान्याच्या मिल हाऊस, बॉयलिंग हाऊस आणि पॉवर हाऊसच्या छतांचे पत्रे उडून गेले आहेत. या दुर्घटनेत कारखान्याची यंत्रसामग्री, लोखंडी पत्रा, अल्युमिनियम पार्टिशन, रोलिंगशटर आणि ऑफिसमधील पीओपी सिलिंगचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याव्यतिरिक्त, ई.टी.पी. सेक्शन आणि पॉवर हाऊस मधील विविध कंट्रोल पॅनेल्स व इलेक्ट्रिकल यंत्रणा पावसामुळे भिजून निकामी झाली आहे.
या यंत्रसामग्रीच्या नुकसानीचा आकडा ९२ लाख ७२ हजार ५१८ रुपये इतका वर्तवण्यात आला आहे. वादळाचा तडाखा कारखान्यातील गोदामांनाही बसला असून, गोडाऊनचे छत उडून गेल्याने पावसाचे पाणी आत शिरले आहे. यामुळे गोदामात साठवलेली ५०० क्विंटल साखर भिजून खराब झाली असून, त्याचे नुकसान १८ लाख २५ हजार रुपये इतके आहे. कारखान्याच्या इमारतींचे स्ट्रक्चर आणि साखरेचे नुकसान मिळून एकूण १ कोटी २१ लाख ९७ हजार५१८ रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पंचनाम्यातून व्यक्त करण्यात आला आहे.
लेंगरे भागात कारभार कोतवाल भरोसे
दरम्यान एकीकडे साखर कारखान्याच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी तातडीने उपलब्ध झाले. मात्र लेंगरे परिसरातील शेतकयांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ताटकळत बसावे लागले. वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीस ग्रामस्थांनी कोतवालांचा आधार घेतला. त्यांच्या माध्यमातून पंचनामे करून घेण्याची वेळ नुकसानग्रस्त शेतकयांवर आली. त्यामुळे या भागातील महसूलचा कारभार 'कोतवाल भरोसे' असल्याची चर्चा सुरू झाली आहे.