वादळी पावसामुळे सावंतवाडी तालुक्यात ३० लाखांचे नुकसान
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी शहर तसेच ग्रामीण भागात गुरुवारी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे सुमारे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले. छपरांचे पत्रे उडणे, घरावर झाडे पडणे असे प्रकार वादळामुळे झाले. सावंतवाडी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या छतावर पत्रे पडल्याने 12 लाख 66 हजार रुपयांचे नुकसान झाले तर लेक व्यु हॉटेलचे पत्रे उडाल्याने वैभव विजय सावंत यांचे 11 लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाले याशिवाय ज्योती विजय मुद्रा यांचे १८ हजार रुपयांचे विष्णू दत्तराम गावडे यांचे २२ हजार रुपयांचे प्रशांत गोसावी यांचे 16 हजार रुपयांचे, चेतन अशोक गुप्ता यांचे २० हजार रुपयांचे, श्रीम. स्नेहा सबनीस यांचे ५० हजार रुपयांचे तर गौरी परब यांचे २० हजार रुपयांचे नुकसान झाले तर सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात टॉवर व मांगरांच्या छतावर झाडे पडून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले . महसूल विभागातर्फे नुकसानीचा पंचनामा सुरू आहे.