For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News | डाळिंबाच्या बागा उन्मळून पडल्या, होत्याचं नव्हतं झालं... आटपाडी आणि शेटफळे परिसरात शेतकऱ्यांवर मोठं संकट!

01:03 PM Jun 07, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   डाळिंबाच्या बागा उन्मळून पडल्या  होत्याचं नव्हतं झालं    आटपाडी आणि शेटफळे परिसरात शेतकऱ्यांवर मोठं संकट
Advertisement

Advertisement

आटपाडी : आटपाडी शहरासहतालुक्यात शुक्रवारी झालेल्या वादळी बारे आणि पावसाच्या तडाख्याने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नुकसानीचा फटका शेतकरी, नागरिकांना बसला. आटपाडीतील नगरपंचायतकडील कर्मचाऱ्याच्या घरावर झाड उन्मळून पडल्याने नुकसान झाले. तर आटपाडी-पांढरेवाडी, पाटीलमळा, शेटफळे, मासाळवाडी येथे डाळिंब बागा उन्मळून पडण्याच्या घटना घडल्याने लाखोंचे नुकसान झाले.

आटपाडी शहरासह तालुक्यात गत रविवारी प्रचंड वादळी वारे, ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजला होता. त्यात मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा शुक्रवारी प्रचंड वादळाने हजेरी लावत नुकसानीत भर टाकली आहे. शुक्रवारी सायंकाळी वादळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला. धुळीचे प्रचंड मोठे लोट, झाडे उन्मळून पडणे, विजेचे खांब पडणे, विजेच्या तारा तुटणे,डाळिंबासह अन्य पिकांचे नुकसान होण्याचे प्रकार घडले. बादळी वाऱ्यामुळे आटपाडी चौंडेश्वर कॉ लनी येथे नगरपंचायत कर्मचारी विष्णु कांबळे यांच्या घरावर निलगिरीची झाडे उन्मळून पडुन मोठे नुकसान झाले. सुदैवाने घरातील सदस्यांनी बाहेर धाव घेतल्याने जिवीतहानीझाली नाही.

Advertisement

येथील ताई हातेकर यांच्या घराचेही झाड पडल्याने नुकसान झाले. आटपाडी-पांढरेवाडी, पाटीलमळा, कॅनॉल परिसरातील शेतकऱ्यांच्या डाळिंबाला बादळी बारे आणि पावसाला मोठा फटका बसला.मयुर भारत जाधव, रावसाहेब पाटील, दत्तात्रय पाटील, बिलास पाटील, लक्ष्मण जाधव, विष्णुपंत चव्हाण, तुकाराम पाटील यांच्या डाळिंब बागेतील झाडे उन्मळून पडली. बागेवरील अच्छादन उडुन गेले. बागेमध्ये फळे तुटून सर्वत्र अच्छादन पसरले. याची माहिती मिळताच शरद पाटील यांनी धाव घेवुन याची माहिती आमदार सुहास बाबर यांना दिली.

Advertisement
Tags :

.