महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बंद पडलेली पाणीपुरवठा योजना सुरू

06:05 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कंग्राळी बुद्रुक नागरिकांना दिलासा

Advertisement

कंग्राळी बुद्रुक/ वार्ताहर

Advertisement

येथील नेताजी गल्लीमधील बंद पडलेली पाणी पुरवठा योजना सुरू केल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ग्राम पंचायत सदस्य अनिल पावशे, सदस्य भारता पाटील, सुनिता कोळी यांनी शासकीय निधीतून अथक परिश्रम घेवून गेल्या कित्येक दिवसांपासून बंद पडलेली सदर योजना सुरू करून नागरिकांना दिलासा दिला आहे.

पूर्वी नेताजी गल्ली येथे नागरिकांना घरगुती पाणी वापरासाठी कूपनलिकेची खोदाई केली होती. सदर कूपनलिकेला पाणी भरपूर होते. परंतु सदर पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे फक्त घरगुती वापरासाठी वापरले जात होते. मात्र कूपनलिका नादुरुस्त झाल्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. ग्राम पंचायत सदस्य अनिल पावशे व सहकाऱ्यांनी दुरुस्तीचे प्रयत्न केले. परंतु ती कूपनलिका दुरुस्त न झाल्यामुळे त्यांनी मरगाईनगर येथील मल्लाप्पा पाटील यांच्या दाराजवळ नवीन कूपनलिकेची शासकीय निधीतून खोदाई करून घेतली आणि नूतन कूपनलिकेला भरपूर पाणी लागल्यामुळे पाईप लाईनव्दारे नेताजी गल्लीतील पूर्वीच्या नळाला जोडून पाणी पुरवठा सुरू केला.

कूपनलिकेला पिण्यायोग्य पाणी

नवीन खोदाई केलेल्या कूपनलिकेला पिण्यायोग्य पाणी लागल्यामुळे आणि पाईपलाईनव्दारे हे पाणी नेताजी गल्लीमध्ये आणल्यामुळे नेताजी गल्लीतील नागरिकांना आता दररोज पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article