महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोन दिवसांच्या घसरणीला विराम!

07:00 AM Jan 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्सची 491 तर निफ्टी 141 अंकांवर उसळी : जागतिक बाजारात मात्र नरमाईचा कल

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

चालू आठवड्यातील मागील दोन सत्रांमध्ये भारतीय भांडवली बाजारात आलेल्या घसरणीला अखेर गुरुवारच्या सत्रात पूर्णविराम मिळाला आहे. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत राहिल्याने जागतिक पातळीवरील घसरणीच्या प्रवासातही भारतीय बाजार तेजीसह बंद झाला आहे. मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 490.97 अंकांनी वधारुन निर्देशांक 71,847.57 बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 141.25 अंकांनी वधारुन निर्देशांक 21,658.60 वर बंद झाला आहे. व्यापक बाजारात बीएसई मिडकॅपचा निर्देशांक 1.5 टक्के आणि बीएसई स्मॉलकॅपचा निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारुन बंद झाला आहे. भारतीय बाजारातील तज्ञांच्या माहितीनुसार शेअर बाजारात तेजी असली तरी आगामी काळातील रणनीती निश्चित करताना गुंतवणूकदारांना सावध भूमिका घेणे अतिशय महत्त्वाचे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये बजाज फायनान्स, टाटा कंझ्युमर, एनटीपीसी तेजीत राहिले आहेत. तर बीपीसीएल, लार्सन अॅण्ड टुब्रो, माइंडट्री, डॉक्टर रे•ाrज लॅब आणि एचसीएल टेक यांचे समभाग हे प्रभावीत राहिले आहेत. गुरुवारी मजबूत परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये फेडरल बँक, अपोलो, कोरोमंडल इंटनॅशनल, महिंद्रा हॉलिडेज, सीएमएस इन्फो सिस्टम आणि अशोक लेलँड आदी समभागात तेजीची नोंद करण्यात आली आहे. तर पिडीलाइट, जेनसोल इंजिनिअरिंग, युनिफॉर्म इंडिया, आयएसएमटी लिमिटेड, फिनोलेक्स केबल, होम फर्स्ट फायनान्स आणि गेटवे डिस्ट्रिक्ट पार्क यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.  जागतिक पातळीवरील विविध घडामोडींमध्ये फेडरल रिझर्व्हचा निर्णय व आंतरराष्ट्रीय राजकीय घटना यांचा परिणाम हा येत्या काही काळात भारतीय बाजारात राहणार असल्याचे संकेत अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना सावध भूमिका घेत आपली रणनीती निश्चित करावी लागणार आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article