कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बसेसचा खडखडाट थांबवा

03:47 PM May 09, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

काही एसटी बसेस्च्या खिडकीच्या काचा फुटल्या आहेत, काही बसेस्मध्ये पंखे आणि पडदे नाहीत, अशी नाराजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य कामगार अधिकारी राजेंद्र कोनवडेकर यांनी व्यक्त केली. तर मध्यवर्ती बसस्थानकातील स्वच्छतेबद्दल समाधान व्यक्त करत फुलझाडे लावून सुशोभिकीकरण करण्याच्या सूचना कोनवडेकर यांनी दिल्या.

Advertisement

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून एसटी महामंडळांच्या कामकाजाकडे बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. एसटीमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर एसटीच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयातील मुख्य कामगार अधिकारी राजेंद्र कोनवडेकर यांनी गुरुवारी कोल्हापूर विभागातील आगारांना भेटी दिल्या. सकाळी त्यांनी इचलकरंजी आणि हुपरी येथील बसस्थानकांची पाहणी केली. इचलकरंजी बसस्थानकांचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. या बसस्थानकाची त्यांनी प्रशंसा केली. यानंतर कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत कोल्हापूर कामगार अधिकारी संदीप भोसले, स्थानक प्रमुख मल्लेश विभुते, सहायक कार्यशाळा अधीक्षक विजय निगडे होते.

मध्यवर्ती बसस्थानकांतील स्वच्छतेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पण आणखी सुशोभिकीकरण करण्याची सूचना केली. मात्र बसेसच्या दुरावस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली. वेळच्या वेळी बसेस्ची देखभाल - दुरुस्ती होत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. बहुतांश बसेसचा खडखडाट आहे. पडदे नाहीत, खिडकीच्या काचा फुटल्या आहेत, पंखे नाहीत. यामुळे प्रवाशांच्या तक्रारी आहेत. चालकांच्या वर्तणुकीत सुधारणा झाली पाहिजे, अशा सूचना कोनवडेकर यांनी केल्या.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article