For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मळगाव स्थानकावर एक्स्प्रेसना थांबा द्या !

05:31 PM Nov 08, 2023 IST | अनुजा कुडतरकर
मळगाव स्थानकावर एक्स्प्रेसना थांबा द्या
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
मळगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस मंगलोर एक्सप्रेस राजधानी एक्सप्रेस आणि नागपूर मडगाव एक्सप्रेस या गाड्यांना थांबा देण्यात यावा,अशी मागणी मळगाव पंचक्रोशीतील लोकप्रतिनीधींनी केली आहे.दरम्यान येथील रेल्वे स्टेशन समस्यांच्या गर्तेत आहे.त्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना अनेक गैरसोईना सामोरे जावे लागत आहे.याबाबत प्रवाशांची नाराजी लक्षात घेता तात्काळ योग्य तो निर्णय घेऊन समस्या दूर करा,अन्यथा आंदोलन करु असा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला.याबाबतचे निवेदन मळगाव,निरवडे,वेत्ये,होडावडे गावातील सरपंच उपसरपंचासह ग्रामस्थांनी स्टेशनमास्तर प्रतिक्षा गावकर यांच्याकडे दिले आहे.याबाबत आवश्यक सौ.गावकर यांनी यावेळी दिले.यावेळी निरवडे सरपंच सुहानी गावडे,वेत्ये सरपंच गुणाजी गावडे,मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर,निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर,भूषण बांदिवडेकर,प्रकाश जाधव,सागर तळवडेकर,एकनाथ जाधव,काका पांढरे,बबन आसोलकर,साई गावडे,गौरव माळकर,सिताराम गावडे,आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले की,सावंतवाडी रेल्वे स्थानक हे सिंधुदुर्गातील एक महत्वाचे स्थानक आहे.आणि येथे दिवसाकाठी शेकडो प्रवासी प्रवास करतात परंतु अपेक्षित प्रवासी संख्या आणि उपन्न या स्थानकाचे असूनदेखील येथे प्रवासी सुविधांचा अभाव आहे.तर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे टर्मिनस फेज १ काम जवळपास पूर्ण झाले असून फेज २ चे काम पूर्णत बंद आहे त्या कामाला विलंब झालेला असून ८.१४ कोटींचा निधी मागे गेला होता.तो पुन्हा उपलब्ध करुन द्यावा,अन्यथा स्थानिक लोकप्रतिनिधीमार्फत अधिकचा निधी मंजूर करण्यात यावा.केंद्र सरकारकारच्या अमृत भारत स्थानक योजनेत सावंतवाडी स्थानकाचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा करणे.पीआरएस सुविधा पूर्णवेळ उपलब्ध करुन देणे.सरकत्या जिन्यासहित प्लॅटफार्म क्रमांक १ आणि प्लॅटफार्म क्रमांक ३ ला जोडणारे एफओबीला पूर्ण शेड टाकणे सावंतवाडी ते वसई मुंबई रोज नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत.

सावंतवाडी कल्याण जंक्शन मुंबई पुणे ही दररोज धावणारी नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत.  पेडणे,मडगाव,कारवार,मेमू ट्रेनचा विस्तार सावंतवाडी पर्यंत करावे सद्या पेडणे कारवार मेमू ट्रेन झेडबीटीटीमुळे रद्द आहे परंतु मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मोपा पेडणे भविष्यात प्रवाशांची संख्या वाढेल आणि या मेमू ट्रेनचा वापर प्रवाशांच्या सोयीसाठी देखील केला जाईल प्रवाशांच्या सोयीसाठी फलाट क्रमांक १,२ व ३ वर शेड उभारणे बेळगाव ते सावंतवाडी ह्या नवीन ब्रॅाड गेज मार्गासाठी प्रयत्न करावेत सावंतवाडी स्थानकावर १२१३३/३४ मंगलोर एक्सप्रेस ,२२२२५/३० वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा मिळावा.तसेच कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या राजधानी एक्सप्रेस गरीबरथ एक्सप्रेस आणि नागपूर मडगाव एक्स्प्रेसचा थांबा पूर्ववत करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.