For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Gokul | गोकुळ'ची बदनामी थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरू; कर्मचारी संघटनेचा राजकीय नेत्यांना इशारा

12:33 PM Apr 19, 2026 IST | NEETA POTDAR
gokul    गोकुळ ची बदनामी थांबवा  अन्यथा रस्त्यावर उतरू  कर्मचारी संघटनेचा राजकीय नेत्यांना इशारा
Advertisement

                                  गोकुळ बचावासाठी कर्मचारी व शेतकरी एकवटले

Advertisement

कोल्हापूर - सहकारामध्ये गेल्या सहा दशकापासून अधिक काळ नावाजलेल्या आणि अतिशय उत्तम प्रकारे कार्यरत असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पावक संघाची (गोकुळ) राजकीय बर्चस्वावरून सुरू असलेली बदनामी थांबवानी, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असे पत्रक कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कर्मचारी संघटना व ऑल इंडिया ट्रेड युनियनच्या (आयटक) वतीने प्रसिध्वीस देण्यात आले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, आजपर्यंतच्या इतिहासात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रुपयातील ८५ पैसे शेतकऱ्यांना परतावा देणारी गोकुळ एकमेव संस्था आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे गोकुळला प्रतिस्पर्धी म्हणून अनेक दूध संघ, संस्था स्थापन झाल्या आणि त्यांचे अस्तित्वही संपले. गोकुळमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळे गोकुळची बदनामी होत आहे. लाखो दूध उत्पादक शेतकरी,सुमारे दोन हजार कर्मचारी, ठेकेदार, वितरक व व्यावसायिकांच्या कुटुंबांचे भवितव्य गोकुळवर अवलंबून आहे. गोकुळची बदनामी झाल्यास त्याचा परिणाम संस्थेवर अवलंबून असलेल्या घटकावर होणार आहे. त्यामुळे य राजकीय मंडळींनी काळजी घ्यावी, व वीं गोकुळची बदनामी थांबवावी अन्यथा न नाईलाजास्तव दूध उत्पादक शेतकरी व कामगारांना रस्त्यावर उतरावे प्त लागेल असा इशाराही दिला आहे.

Advertisement

दूध संघ कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी शाहीर सदाशिव निकम, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी रघुनाथ कांबळे, आयटकचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड दिलीप पवार, आयटकचे अध्यक्ष एस. बी. पाटील, मल्हार पाटील, शंकर पाटील, व्ही. डी. पाटील, लक्ष्मण पाटील, दत्ता बच्चे, शिवाजी पाटील, अशोक पुणेकर, संदीप लाटकर, लक्ष्मण आढाव आदिंनी हे संयुक्त हे पत्रक दिले आहे.

स्वार्थासाठी गोकुळची बदनामी थांबवावी
गोकुळमध्ये राजकीय हस्तक्षेप होतील आणि गोकुळच्या हिताला बाधा पोहचेल त्यावेळी संस्थापक कै. आनंदराव पाटील-चुयेकर, कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे, माजी चेअरमन अरुण नरके यांनी संस्थेची बदनामा करणऱ्यांना संयुक्तपणे इशारा देण्याचे काम त्यांच्या काळात केले आहे. आज देखील राजकीय वर्चस्वावरून गोकुळची बदनामी सुरू आहे, त्याचा आम्ही गोकुळमध्ये राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या राजकीय मंडळींचा निषेध करत आहोत. त्यांनी आपल्या स्वार्थासाठी गोकुळची बदनामी थांबवावी, असे पत्रकात म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.