For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime : आटपाडीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचार वाहनावर दगडफेक

05:03 PM Feb 02, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime   आटपाडीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचार वाहनावर दगडफेक
Advertisement

                                 आटपाडीत निवडणूक प्रचाराला हिंसक वळण

Advertisement

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार अॅड. विद्याताई मोटे प्रचार वाहनावर विभुतवाडी येथे हल्ला करून दगडफेक करण्यात आली. आमच्या प्रचार सभेलगतच जाणिवपुर्वक स्पिकर लावल्याचा आरोप करत वाहनावर दगडफेक केली. या घटनेमुळे निंबवडे गटातील निवडणुकीत निवडणुक हातघाईवर आल्याचे स्पष्ट झाले.

आटपाडी तालुक्यातील चार जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती निवडणुकांसाठी चुरशीने प्रचार सुरू आहे. भाजप विरूध्द शिवसेना अशी सरळसरळ लढत होत असुन राष्ट्रवादी, स्वाभिमानी विकास आघाडी शिवसेनेच्या बाजुने उभी आहे. तालुक्यातील निंबवडे गटातील लढत हाय होल्टेज बनली आहे. येथे माधवीताई ब्रम्हानंद पडळकर या भाजपकडून तर विद्याताई सचिन मोटे या शिवसेनेकडुन निवडणुक लढवताहेत.

Advertisement

भाजपसह पडळकर बंधुंसमोर या लढतीने आव्हान दिले आहे. त्यातुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये वादंगासह हातघाईचे प्रकार घडत आहेत. रविवारी विभुतवाडी येथे भाजप उमेदवार माधवीताई पडळकर यांच्या प्रचारार्थ सभा सुरू असताना रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला शिवसेना उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराचे वाहन उभे होते. त्या वाहनाच्या आवाजाच्या कारणावरूनवादंग झाल्याने हे प्रकरण थेट बाहनावर हल्ल्यापर्यंत पोहचले. भाजपच्या प्रचारसभेलगत मोठ्याने जाणीवपूर्वक शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराचा स्पिकर चालु होता. त्यांना आवाज बंद करण्यास सांगुनही प्रतिसाद न दिल्याने चालकाशी शाब्दीक बाद होवुन भाजप समर्थकांनी गाडीवर दगडफेक करून गाडीचे नुकसान केले.

तर शिवसेना उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचारार्थ सुरू असलेल्या पथनाट्यात अडथळा आणुन भाजप समर्थकांनी प्रचाराचे वाहन फोडुन दहशत निर्माण केल्याचा आरोप शिवसेना समर्थकांनी केला. या घटनेत चुक कोणाची? यापेक्षा जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमिताने होणाऱ्या अशा घटनांमुळे लोकशाही ठोकशाहीत रूपांतरीत झाल्याचे सिध्द झाले आहे. प्रचाराचे वाहनावर दगडफेकीच्या घटनेमुळे निंबवडे जिल्हा परिषद गटातील निवडणुक उर्वरीत कालावधीत आणखी संघर्षशील होण्याची भिती व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.