कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केएमटी बसवर दगडफेक करणाऱ्यांना फिरविले

11:44 AM Jan 17, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

दशहत माजविण्याच्या उद्देशाने शहरातील व्हिनस कॉर्नर चौकात दोन दिवसापूर्वी केएमटी बसेसवर दगडफेक कऊन, केएमटीची तोडफोड केली होती. या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन तऊणाचा समावेश आहे. शाहुपूरी पोलिसांनी गुन्हेगार अभिषेक मंगेश घोडके (वय 26, रा. राजरामपूरी, कोल्हापूर), त्याचे साथिदार आसिफ आमनुल्ला नायकवडी (वय 30, रा. इंगळी, ता. हातकणंगले), ओंकार जगन्नाथ चौगुले (वय 22, रा. पाथऊट गल्ली, सायबर चौक, कोल्हापूर) या तिघांना गुऊवारी सांयकाळी काढण्या बांधून, व्हिनस कॉर्नर चौकात तपासासाठी फिरविले. याना पाहण्यासाठी रस्त्यावर नागरीकांनी गर्दी केली होती. त्यामुळे या चौकातील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.

Advertisement

व्हिनस कॉर्नर चौकालगतच्या एका बारमध्ये गुन्हेगार अभिषेक घोडके त्याचे साथिदार आसिफ नायकवडी, ओंकार चौगुले आणि अन्य अल्पवयीन तऊण मंगळवारी (14 जानेवारी) दुपारी दाऊ पित बसले होते. दाऊची नशा डोक्यात गेल्यानंतर गुन्हेगार घोडके आणि त्याच्या साथिदारांनी संबंधीत बार मधून बाहेर आले. या टोळक्याने आपली दशहत निर्माण व्हावी, या उद्देशाने रस्त्यावर धिंगाणा घालीत, रस्त्यावऊन येणारी-जाणारी वाहने अडवू लागले होते. याचदरम्यान मध्यवर्ती बस स्थानककडून बोंद्रेनगराकडे जाणाऱ्या केएमटी बस या टोळक्याने दगडफेक कऊन केएमटी बसची तोडफोड केली होती. हा संपूर्ण प्रकार चौकातील एका दुकानदारांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. याबाबत केएमटी बस चालक प्रकाश ज्ञानू झोरे यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवऊन गुन्हेगार अभिषेक घोडकेसह तिघांना अटक केली. तर त्याच्या अल्पवयीन साथिदाराला ताब्यात घेतले. अटक केलेल्या तिघांना शाहुपूरी पोलिसांनी तपासाच्या नावाखाली व्हिनस चौक परिसरात काडण्या बांधून फिरविले.

चौकात दशहत निर्माण करण्यासाठी केएमटी बसवर दगडफेक कऊन, बसची तोडफोड केल्याप्रकरणक्ष पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक घोडके त्याचे साथिदार आसिफ नायकवडी, ओंकार चौगुले या तिघांना अटक केली आहे. गुन्हेगार घोडके हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्या विरोधी जिह्यातील गोकूळ शिरगाव, राजारामपूरी, गांधीनगर, शाहुवाडी आणि शाहुपूरी या पाच पोलीस ठाण्यात गंभीर स्वऊपाचे गुन्हे नोंद आहेत.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article