भागलपूर-हावडा वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक
06:21 AM Apr 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मालदा :
Advertisement
पश्चिम बंगालमध्ये भागलपूर-हावडा वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाली आहे. या दगडफेकीत सुदैवाने कुणीच जखमी झालेला नाही. भागलपूर आणि टिकानी स्थानकांदरम्यान असलेल्या हाटपुरैनी हॉल्टनजीक दगडफेकीचा प्रकार घडला. दगडफेकीनंतर कोच नंबर सी2 च्या खिडकीची काच तुटल्याचे आढळून आल्याची माहिती मालदा डीआरएम मनीष कुमार गुप्ता यांनी दिली आहे. दगडफेक करणाऱ्या गुन्हेगारांची ओळख पटविण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले जात आहे. गुन्हेगारांची ओळख पटवत कायद्यानुसार सर्व आवश्यक पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Advertisement
Advertisement