महाराणा प्रताप चौकात दोन गटात दगडफेक
पूर्व वैमानस्यातून प्रकार
एक तास तणाव, महिला जखमी
कोल्हापूर
पूर्ववैमनस्यातून महाराणा प्रताप चौकामध्ये रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दोन गटात दगडफेक झाली. सुमारे अर्धा तासाहून अधिक वेळ ही दगडफेक सुरू होती. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. याघटनेमध्ये दोन महिला जखमी झाल्या असून सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराणा प्रताप चौकातील दोन गटामध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद आहे. या वादातून या परिसरात नेहमीच तणावाचे वातावरण असते. किरकोळ कारणावरून शनिवार पासून या गटातील वाद धुमसत होता. रविवारी रात्री या दोनही गटातील वाद उफाळून आला. 11 वाजण्याच्या सुमारास दोनही गट आमने सामने आले. दोनही गटाकडून एकमेकांवर दगड आणि विटा फेकून मारल्या. सुमारे 10 ते 15 मिनिटे हा प्रकार सुरू होता. यामुले घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्याना पंगविण्यात आले. यानंतर ही अर्धा तास दोनही गट सामोरा समोर थांबून होते. अखेरीस पोलीस गर्दीला पांगवण्यासाठी किरकोळ लाठीचार्ज केला. दरम्यान या घटणेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.