बंगालच्या बीरभूममध्ये पोलिसांवर दगडफेक
06:07 AM Apr 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बीरभूम
Advertisement
पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात सूरी येथे रस्तेनिर्मितीवरून झालेल्या वादादरम्यान पोलिसांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात अनेक पोलीस जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 14 समाजकंटकांना अटक केली आहे. एका दफनभूमीनजीक अर्थमूव्हर मशीनने चुकून मातीने झाकलेल्या एका थडग्याला खोदल्याने तेथे तणाव निर्माण झाला. तेथे एकाच समुदायाचे दोन गट परस्परांना भिडले होते.
Advertisement
Advertisement