Jat News | पहिल्या पतीला सोडून दुसऱ्यासोबत राहण्याचा राग; जतमध्ये डोक्यात दगड मारून जिवे मारण्याचा प्रयत्न!
जतमध्ये झोपेत असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड; आरोपी अटकेत
जत: जत शहरातील घाटगेवाडीरोड परिसरात झोपेत असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी जत पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
अश्विनी होमशिंग राठोड (वय २९, रा. घाटगेवाडी रोड, पादुका मंदिरामागे, जत) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, १ जून रोजी पहाटे १ ते सकाळी ६ च्या दरम्यान त्यांच्या घरी ही घटना घडली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी प्रकाश
राठोड (रा. दरीबडची, ता. जत) याने, फिर्यादी आपल्या पहिल्या पतीसोबत न राहता ओमसिंग याच्यासोबत राहत असल्याचा राग मनात धरला होता.
त्यातून ओमसिंग हा झोपेत असताना त्याच्या डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केली. त्यानंतर आरोपी पळून गेला.याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १०९, ३५१ व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.