For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बारामतीतून चोरी झालेली दुचाकी कराडमध्ये हस्तगत

03:02 PM Mar 21, 2025 IST | Radhika Patil
बारामतीतून चोरी झालेली दुचाकी कराडमध्ये हस्तगत
Advertisement

कराड :

Advertisement

बारामती येथून चोरीस गेलेली दुचाकी शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आज संशयितासह पकडली. संबंधित दुचाकी ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी बारामती पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आली.

वाहतूक शाखेच्या महिला कर्मचारी अश्विनी सूर्यवंशी या पोपटभाई पेट्रोलपंपाच्या परिसरात पेट्रोलिंग करत होत्या. त्यादरम्यान त्यांनी एक दुचाकी थांबवून त्याची पाहणी करताना त्यांच्या पुढील नंबरप्लेट नसल्याचे लक्षात आले.

Advertisement

त्यावेळी त्यांनी संबंधित दुचाकीस्वार आनंदा शामराव भिसे (रा. मेष्टेवाडी, ता. पाटण, सध्या रा. अतित. ता. सातारा) याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्याने उडावाउडवीची उत्तरे दिली. त्याचबरोबर गाडीची कागदपत्रे देण्यासह त्याने नकार दिला. त्यानंतर अश्विनी सूर्यवंशी यांनी ती गाडी संशयितासह वाहतूक शाखेत नेली. तेथे त्या गाडीची पोलीस खात्याच्या अॅपवर चेस नंबरसह तपासणी केल्यावर ती गाडी बारामती येथून चोरीस गेली असून ती दिनेश सरोदे यांच्या मालकीची असल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन संबंधित दुचाकी ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने पोलिसांनी संशयितासह दुचाकी ताब्यात घेतली. संबंधित दुचाकी आणि संशयितास बारामती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त अधीक्षक वैशाली कडुकर, उपअधीक्षक अमोल ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी अश्विनी सूर्यवंशी, संजय चव्हाण, राजु देशमुख, सुरेश सावंत, विष्णु मर्ढेकर, राजाराम जाधव, सोनम पाटील, प्रेमदास गवाले, सागर चव्हाण यांनी कारवाई केली.

Advertisement
Tags :

.