For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तरप्रदेशमधील चोरट्यांकडून आठ लाखांचे चोरीचे दागिने जप्त

01:13 PM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
उत्तरप्रदेशमधील चोरट्यांकडून आठ लाखांचे चोरीचे दागिने जप्त
Advertisement

कागवाड पोलिसांनी सहा जणांना केली अटक

Advertisement

बेळगाव : बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेजवळील दागिने व रोकड पळविणाऱ्या उत्तरप्रदेशमधील सहा जणांच्या आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीला कागवाड पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी सोमवारी पत्रकारांना यासंबंधीची माहिती दिली आहे. मोहम्मद इस्लाम मोहम्मद मतलूब (वय 42) राहणार साठा, इस्लामाबाद, ता. जि. बुलंद शहर, जपरयाब महम्मद खान (वय 45) राहणार हाजीपूर, बटोल, ता. जि. बुलंद शहर, महम्मद अकील महम्मद ईस्माईल (वय 50) राहणार कुचेजा, ता. जि. बुलंद शहर, राजपाल हरीसिंग (वय 64) राहणार निजामपूर, ता. कुरजा, जि. बुलंद शहर, दवजी बहोरी (वय 53) राहणार अदोली, ता. जि. बुलंद शहर, कैराती मेहमूद खान (वय 47) राहणार हाजीपूर, बेटाल, ता. जि. बुलंद शहर अशी त्यांची नावे आहेत.

11 मे 2026 च्या सकाळी 9 ते 9.50 या वेळेत कागवाड बसस्थानकावरून जुगुळकडे जाणाऱ्या वैशाली मल्लय्या दोडमनी, राहणार तेरदाळ, ता. रबकवी-बनहट्टी, जि. बागलकोट या महिलेजवळील 30 ग्रॅमचे मंगळसूत्र, 12 ग्रॅमचा नेकलेस, 11 ग्रॅमचे मंगळसूत्र, 1 ग्रॅमची रिंग असे एकूण 54 ग्रॅम सोन्याचे दागिने, 15 हजार रुपये रोख रक्कम अज्ञातांनी पळविली होती. यासंबंधी कागवाड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले होते. अथणीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत मुनवळ्ळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर, कागवाडचे पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र खोत व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तरप्रदेशमधील सहा जणांच्या आंतरराज्य गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याजवळून 7 लाख 95 हजार रुपये किमतीचे 53 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. उत्तरप्रदेशमधील एकूण दोन गुन्हेगारी टोळ्या कागवाड पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.