For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

विश्वचषक टी-20 स्पर्धेतून स्टोक्सची माघार

06:22 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
विश्वचषक टी 20 स्पर्धेतून स्टोक्सची माघार

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

जून महिन्यात अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने तंदुरुस्तीच्या समस्येमुळे माघार घेतली आहे.

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने आपला हा निर्णय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाला कळविला आहे. आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला दोन महिन्यांचा कालावधी बाकी असताना स्टोक्सचा हा निर्णय इंग्लंड संघाला धक्का देणारा ठरला आहे. स्टोक्स हा इंग्लंडचा जागतिक दर्जाचा अष्टपैलू म्हणून ओळखला जातो. दरम्यान भारताच्या दौऱ्यामध्ये स्टोक्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली होती. फलंदाजीत तसेच गोलंदाजीतही तो प्रभावी ठरला नव्हता. स्टोक्सच्या अष्टपैलू प्रतिमेला ही कामगिरी धक्का देणारी होती. या दौऱ्यात स्टोक्सला तंदुरूस्तीची समस्याही जाणवत होती. येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत आपण तंदुरूस्तीची समस्येतून मार्ग काढणार असून सरावावर अधिक भर देणार असल्याने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाला भारताविरुद्धची कसोटी 1-4 अशी गमवावी लागली होती. गोलंदाजी करताना आपल्याला शस्त्रक्रिया केलेल्या गुडघ्यावर अधिक ताण पडत असल्याचे स्टोक्सने म्हटले आहे. 2022 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडने जेतेपद पटकाविले होते. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 5 गड्यांनी पराभव केला होता आणि स्टोक्सने विजयी धाव घेतली होती.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.