कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महू धरणात प्लास्टिक कचऱ्याचा साठा

12:42 PM Aug 01, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

पाचगणी  :

Advertisement

जावळी तालुक्यातील पाचगणी पायथ्याला डोंगराच्या कुशीत असलेले महू धरणात प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात साठल्याने पाणी दूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष या धरणाकडे होत असल्याने असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तात्काळ धरणाच्या भिंती लगत जमा झालेला प्लास्टिक कचऱ्याचे निर्मूलन करावे, अशी मागणी युवानेते सुजित गोळे यांनी केली आहे.

Advertisement

पाचगणीच्या पायथ्याला डोंगररांगांच्या उतारावर महू धरण बांधले आहे. डोंगरावरून येणारे संपूर्ण पाणी स्वच्छ व निर्मळ या धरणपात्रात जमा होत आहे. यावर्षी महू धरण पूर्ण क्षमतेने भरले असून या पाण्याचा अद्याप सिंचनासाठी कसलाही वापर केला जात नसल्याने संपूर्ण धरण पात्रात हे पाणी १२ महिने साचलेले राहते.

निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या या परिसरात अनेक पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत राहतात, मात्र या पर्यटकांवर कोणाचेही बंधन नसल्याने या पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक पिशव्या, असा प्लास्टिक कचरा धरण क्षेत्रात टाकला जात आहे. हाच कचरा धरणाच्या पात्रात वाऱ्याने उडून जाऊन पाण्यात तरंगताना आढळतो आहे. त्याचबरोबर या धरणाला मिळालेले छोटे-छोटे ओढे नाले यामधून देखील मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा वाहून येत आहे. हा कचरा महू धरणाच्या भिंती लगत मोठ्या प्रमाणात साठला गेला आहे.

या धरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पाईपलाईन काम अद्याप सुरू असल्याने धरणाचे काम करणारा ठेकेदार धरण क्षेत्रात कोणतीही काळजी घेताना दिसून येत नाही. अथवा या ठिकाणी सुरक्षारक्षक देखील नसल्याने हे गंभीर प्रकार होत आहेत. अनेकदा पर्यटक सेल्फी फोटो घेण्यासाठी पाण्यात उतरत आहेत. अशा परिस्थितीत अनुचित प्रकार घडल्यास यास जबाबदार कोण असा सवाल सुजित गोळे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग व ठेकेदार यांनी या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावा अशी मागणी गोळे यांनी केली आहे.

धरणाच्या भिंती लगत प्लास्टिक बॉटल, पिशव्या, चप्पल, बूट असा विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात साठला गेला आहे. या कचऱ्यामुळे पाणी दूषित होण्याची भीती निर्माण झाली आहे. संपूर्ण धरण पात्रातील पाणी स्वच्छ असून देखील भिंतीलगत साचलेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे पाणी दूषित होण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तात्काळ हा कचरा पाण्यातून बाहेर काढावा.

दरम्यान, महू धरण क्षेत्रात पाचगणी, रुईघर, गणेशपेठ या परिसरात मोठं मोठी जी हॉटेल्स आहेत. या हॉटेल्स मधील प्लास्टिक कचरा हा उघड्यावर टाकला जातो. हाच प्लास्टिक कचरा पावसाने वाहून येऊन नदीपात्रातुन धरणात येत आहे. मग नेमकं प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करतंय? या हॉटेल्सवर कारवाई का करीत नाही असाच प्रश्न परिसरातील नागरिकांमधून उपस्थित होत आहे

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article