महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोमवारी शेअर बाजार घसरणीसह बंद

06:09 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 500 अंकांनी घसरणीत, बँकिंग समभागांच्या कामगिरीचा दबाव

Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

बँकिंग क्षेत्रातील नकारात्मक कामगिरीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर सोमवारी पाहायला मिळाला. 500 हून अधिक अंकांनी सेन्सेक्स घसरणीत राहिला होता. आयटी आणि फार्मा क्षेत्रातील समभाग मात्र तेजीसह कार्यरत होते.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 523 अंकांनी घसरुन 71072 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 166 अंकांनी कमकुवत होत 21616 अंकांवर बंद झाला होता. सोमवारी निफ्टी मिडकॅप 100, बीएसई स्मॉलकॅप, निफ्टी बँक, त्याचप्रमाणे निफ्टी ऑटो, एफएमसीजी निर्देशांक घसरणीसह बंद झाला होता. दुसरीकडे आयटी आणि फार्मा निर्देशांक मात्र तेजीसह कार्यरत होते. बाजारात डॉ. रे•ाrज लॅब्ज, अपोलो हॉस्पिटल, डिव्हीज लॅब, विप्रो, एचसीएल टेक, महिंद्रा आणि महिंद्रा व एलटीआय माईंड ट्री यांचे समभाग तेजीसह बंद झाले. तर कोल इंडिया, हिरो मोटो कॉर्प, बीपीसीएल, ओनजीसी, टाटा स्टील, एनटीपीसी आणि एसबीआय यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले.

ओरिएंट इलेक्ट्रिक, शारदा क्रॉप केम, दीपक फर्टिलायझर, पॉलीप्लेक्स कॉर्प आणि विनती ऑरगॅनिक्स यांचे समभाग 52 आठवड्याच्या नीचांकी स्तरावर घसरले होते. दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या समूहातील 10 पैकी दोनच कंपन्यांचे समभाग काहीशा तेजीसमवेत कार्यरत होते. एशियन पेंटस्, जिओ फायनान्शीयल, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान झिंक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एक्साईड इंडस्ट्रीज, ओएनजीसी, ओम इन्फ्रा, पटेल इंजिनियरिंग आणि पंजाब अँड सिंध बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले होते.

एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल यांचा समभाग सोमवारी 20 टक्के प्रिमीयमसह बाजारात लिस्ट झाला.  बीएसईवर कंपनीचा समभाग 187 रुपयांवर खुला झाला. कंपनीने समभागाची इश्यू किंमत 155 रुपये ठेवली होती. बाजार बंद होताना समभाग 31 टक्के इतका वाढत 203 रुपयांवर बंद झाला. एपीजे कंपनीचा आयपीओ 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान खुला होता. निफ्टीतील 50 पैकी 34 समभाग सोमवारी नुकसानीसह बंद झाले. विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता माध्यम क्षेत्र 4.43 टक्के आणि सार्वजनिक बँकांचा निर्देशांक 4.43 टक्के नुकसानीसह बंद झाले होते. शुक्रवारी सेन्सेक्स 167 अंकांनी वाढत 71595 व निफ्टी 64 अंकांनी वाढत 21782 अंकांवर बंद झाला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article