For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअर बाजार तेजीसमवेत बंद

07:00 AM Oct 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेअर बाजार तेजीसमवेत बंद
Advertisement

सेन्सेक्स 144 अंकांनी तेजीत : फेडरलकडून व्याजकपात शक्य

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

आशियाई बाजारातील सकारात्मक वातावरण व अमेरिकेतील फेडरलकडून पुन्हा व्याजदर कपातीच्या वातावरणात भारतीय शेअर बाजार सकारात्मकतेत बंद झाला. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 144 अंकांच्या तेजीसोबत 81,611 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 16 अंक वाढत 24998 अंकांवर बंद झालेला पाहायला मिळाला. सेन्सेक्स निर्देशांकाची दिवसभरातली वाटचाल 81832 ते 82002 या अंकांदरम्यान राहिली.

Advertisement

सेन्सेक्समध्ये पाहता टेक महिंद्राचे समभाग सर्वाधिक घसरणीत राहिले होते. 2.32 टक्के घसरणीसोबत समभाग बंद झाले. याशिवाय सनफार्मा, इन्फोसिस, टाटा मोटर्स, टायटन, एल अँड टी आणि टीसीएस यांचे समभाग घसरणीसह बंद झालेले दिसले. तर दुसरीकडे कोटक बँक यांचा समभाग सर्वाधिक म्हणजे 4.16 टक्के वाढत बंद झाला. यासोबत एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, पॉवरग्रिड कॉर्प, मारुती सुझुकी, अॅक्सिस बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी आणि महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभाग तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाले होते.

बुधवारी शेअरबाजारात सेन्सेक्स 167 अंकांनी घसरुन 81467 अंकांवर तर निफ्टी 31 अंकांच्या घसरणीसोबत 24981 अंकांवर बंद झाला होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 16 समभाग तेजीत बंद झाले तर उर्वरीत 13 घसरणीसोबत बंद झाले होते. निफ्टीत पाहता 50 समभागांपैकी 27 समभागात घसरण होती तर 23 समभाग मात्र तेजीत कार्यरत होते. फार्मा क्षेत्राचा निर्देशांक 2.01 टक्के इतका घसरत बंद झाला. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 4562 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले आहेत. एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक आणि अॅक्सिस बँक यांनी बाजाराला आधार दिला तर इन्फोसिस, सनफार्मा आणि लार्सन टुब्रो यांनी बाजाराला खाली खेचण्याचा प्रयत्न केला.

समभाग वधारलेल्या कंपन्या

  • कोटक महिंद्रा      1875
  • एचडीएफसी बँक 1662
  • मारुती सुझुकी      12927
  • पॉवरग्रिड कॉर्प     334
  • महिंद्रा अॅण्ड महिंद्रा    3193
  • जेएसडब्ल्यू स्टील      1006
  • अॅक्सिस बँक         1184
  • इंडसइंड बँक        1360
  • एनटीपीसी            423
  • अल्ट्राटेक सिमेंट  11436
  • बजाज फिनसर्व्ह   1875
  • टाटा स्टील            159
  • बजाज फायनान्स 7321
  • आयटीसी              492
  • अशोक लेलँड       225
  • गेल                     225
  • डाबर इंडिया         571
  • टाटा पॉवर            465
  • कमिन्स                3780
  • हॅवेल्स इंडिया        1935
  • आयआरसीटीसी     883
  • कोल इंडिया          488
  • सिमेन्स                7676
  • बँक ऑफ बडोदा 246

समभाग घसरलेल्या कंपन्या

  • टेक महिंद्रा           1620
  • सनफार्मा               1887
  • इन्फोसिस             1919
  • टायटन                 3447
  • विप्रो                    524
  • टाटा मोटर्स           928
  • लार्सन अॅण्ड टुब्रो  3460
  • एशियन पेन्टस      3064
  • टीसीएस              4228
  • हिंदुस्थान युनि       2754
  • रिलायन्स इंडस्ट्रीज   2742
  • नेस्ले इंडिया          2512
  • आयसीआयसीआय   1243
  • भारती एअरटेल      1678
  • स्टेट बँक               796
  • एचसीएल टेक       1810
  • ल्यूपिन                2157
Advertisement
Tags :

.