For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चौफेर खरेदीने शेअरबाजारात बुधवारी उसळी

06:34 AM Nov 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
चौफेर खरेदीने शेअरबाजारात बुधवारी उसळी
Advertisement

सेन्सेक्स हजार अंकांनी तेजीत : सर्व क्षेत्रे चमकली

Advertisement

मुंबई :

बुधवार हा भारतीय शेअरबाजाराला दमदार तेजीचा दिसून आला. चौफेर खरेदीमुळे सेन्सेक्स 1 हजार अंकांनी व सोबत निफ्टीही 321 अंकांनी वधारत बंद झाला. सर्व क्षेत्रांचे निर्देशांक तेजीसह बंद झाले.

Advertisement

बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1022 अंकांनी दमदार तेजीसोबत 85609 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 320 अंकांनी वाढत 26205 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांकही नव्या विक्रमावर स्वार होत 707 अंकांनी वाढत 59528 अंकांवर बंद झाला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 759 अंकांनी वाढत 61057 च्या स्तरावर कार्यरत होता. निफ्टीतील 50 समभागांपैकी 45 समभाग हे मजबूत कामगिरीसह बंद झाले. येत्या आरबीआयच्या पतधोरण बैठकीत व्याजदर कपातीची आशा, देशी व विदेशी गुंतवणूकदारांचा वाढलेला सहभाग, युक्रेन रशिया युद्धावर ट्रम्प यांच्या सकारात्मक संदेशाने बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह वाढलेला दिसून आला.

हे समभाग तेजीत

समभागांच्या कामगिरीकडे पाहता हुडको, एल अँड टी फायनान्स, सेल, कल्याण ज्वेलर्स, डिक्सन टेक्नॉलॉजी, एचडीएफसी लाइफ, बजाज फिनसर्व्ह, जियो फायनॅन्शीयल, इंटरग्लोब एव्हिएशन, टाटा स्टील, अॅक्सिस बँक, सनफार्मा, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स, मारुती सुझुकी, इन्फोसिस, इटर्नल, ट्रेंट, आयटीसी, एनटीपीसी, सिप्ला, ओएनजीसी, मॅक्स हेल्थकेअर यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले.

हे समभाग घसरणीत

दुसरीकडे घसरणीतल्या समभागांचा विचार केल्यास एशियन पेंटस्, एसबीआय लाइफ, आयशर मोटर्स, अदानी एंरटप्रायझेस, भारती एअरटेल, कोचिन शिपयार्ड, पीआय इंडस्ट्रिज, एमआरपीएल, महिंद्रा आणि महिंद्रा फायनॅन्शीयल, सुंदरम फायनान्स हे समभाग कमकुवत होत बंद झाले. विविध निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास सर्वच क्षेत्रांचे निर्देशांक मजबूत होत बंद झाले.

Advertisement
Tags :

.