For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअरबाजाराची आठवड्याची सुरुवात तेजीने

06:55 AM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेअरबाजाराची आठवड्याची सुरुवात तेजीने
Advertisement

सेन्सेक्स 564 अंकांनी वधारला, निफ्टी 67 अंकांनी तेजे, बँक निर्देशांक वधारला

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजारात तेजीचा कल दिसून आला. आयटी निर्देशांक घसरणीत होता तर बँक निफ्टी निर्देशांक मात्र तेजीत होता. सेन्सेक्स 564 अंकांनी वाढत बंद झाला.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 564 अंकांनी वाढत 74,858 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी 67 अंकांच्या वाढीसह 23,414 अंकांवर बंद झाला. आशियाई बाजारातील उत्साहादरम्यान देशांतर्गत बाजारात खरेदी दिसून आली. या वातावरणात सेन्सेक्सने 692 अंकांच्या वाढीसोबत झेप घेतली आणि निफ्टी 50 नेही 23400 चा टप्पा ओलांडला होता. निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 घसरणीसह बंद झाले.

क्षेत्रीय निर्देशांकांची कामगिरी

विविध निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास रियल्टी आणि फार्मा क्षेत्राचे निर्देशांक प्रत्येकी 1 टक्केपेक्षा अधिक वाढलेले होते. तर निफ्टी एफएमसीजीदेखील 0.95 टक्के वाढला होता. ऑटो, एनर्जी, सीपीएसई, फार्मा व ऑइल व गॅस यांचे निर्देशांकही तेजीसह कार्यरत होते. कमोडिटीज, इन्फ्रा, मेटल या क्षेत्राच्या निर्देशांकावर दबाव दिसून आला. आयटी निर्देशांक अल्पशा घसरणीसोबत बंद झाला.

18 सप्टेंबर 2026 रोजी बीएसईवर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 4,81,60,870.38 कोटी रुपये होते. जे 16 सप्टेंबर 2026 रोजी 4,81,52,354.50 कोटी रुपयांवर घसरले. याचा अर्थ सोमवारी गुंतवणूकदारांच्या भांडवलात 8,515.88 कोटींची थोडीशी घट झाली. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 18 समभाग तेजीत तर 12 समभाग मात्र घसरलेले होते.

समभागांची कामगिरी

निफ्टीत पाहता एचसीएल टेक, इटर्नल यांचे समभाग 2 टक्के वाढत बंद झाले तर आयटीसी, सनफार्मा, रिलायन्स, मॅक्स हेल्थकेअर यांचे समभाग 1 टक्कापेक्षा मजबूत होत बंद झाले. टायटन, बीईएल, कोल इंडिया, कोटक बँक, लार्सन टुब्रो, टाटा कंझ्युमर, आयसीआयसीआय बँक, इंडिगो, मारुती सुझुकी यांचे समभागही तेजीत होते. तर दुसरीकडे भारती एअरटेल, अदानी पोर्टस यांचे समभाग 2 ते 3 टक्के इतके घसरणीत होते तर पॉवरग्रिड, बजाज फायनान्स, अदानी एंटरप्रायझेस, विप्रो यांचे समभाग हे 1 टक्कापेक्षा अधिक कमकुवत झालेले होते.

Advertisement
Tags :

.