For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक दिवसाच्या घसरणीनंतर शेअर बाजार गुरुवारी वधारला

07:00 AM Mar 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
एक दिवसाच्या घसरणीनंतर शेअर बाजार गुरुवारी वधारला
Advertisement

सेन्सेक्स 300 अंकांनी तेजीत, तेल क्षेत्रातील कंपन्या तेजीत

Advertisement

मुंबई : सलग सात दिवसांच्या तेजीनंतर बुधवारी भारतीय शेअर बाजार नुकसानीसह बंद झाला होता. मात्र गुरुवारी वित्त कंपन्या व तेल कंपन्यांच्या कामगिरीमुळे शेअर बाजार वधारत बंद झाला. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 317 अंकांनी वाढत 77606 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 105 अंकांनी वाढत 23591 अंकांवर बंद झाला. अमेरिकेत ऑटो आयातीवर नव्याने 25 टक्के कर लावण्याची घोषणा अध्यक्ष ट्रम्प यांनी केल्याने ऑटो कंपन्यांचे समभाग काहीसे दबावात पाहायला मिळाले.

सुरुवातीच्या सत्रामध्ये जागतिक नकारात्मक वातावरणामुळे शेअर बाजार घसरणीसोबत सुरू झाला होता. बाजार भांडवलमूल्यामध्ये आघाडीवर असणारी रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसी बँक आणि लार्सन टूब्रो यांच्या समभागाने दमदार तेजी दर्शवली. ऑटो आयातीवर लावलेल्या करामुळे भारतातील ऑटो कंपन्यांचे समभाग भारतीय शेअरबाजारात नुकसानीत दिसून आले. टाटा मोटर्सचे समभाग 6.58 टक्के घसरत 661च्या स्तरावर तर आणखी एक कंपनी अशोक लेलँण्डचे समभाग 4.60 टक्के आणि महिंद्रा आणि महिंद्राचे 1.7 टक्के समभाग घसरलेले दिसले. यांच्यासोबत बजाज ऑटो आणि अपोलो टायर्सचे समभागही नकारात्मक कल दर्शवत बंद झाले.

Advertisement

समभागांची कामगिरी

अन्य कंपन्यांच्या समभागांवर नजर टाकल्यास हिरो मोटाकॉर्प, बजाज फिनसर्व, टायटन, इन्फोसिस, कोल इंडिया, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, सिप्ला, अॅक्सिस बँक, ओएनजीसी, टीसीएस, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो, बीपीसीएल, स्टेट बँक, आयटीसी, हिंडाल्को आणि ट्रेंट या कंपन्यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. तरी दुसरीकडे नेस्ले इंडिया, ब्रिटानिया, सनफार्मा, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा स्टील, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, आयशर मोटर्स, कोटक महिंद्रा यांचे समभाग मात्र घसरणीसोबत बंद झाले.

जागतिक बाजारामध्ये पाहता एस अँड पी-500 निर्देशांक 1.1 टक्का घसरणीत होता. डो जोन्स 0.31 टक्के आणि नॅसडॅक कंपोझिट 2.04 टक्के इतका घसरणीत होता. एनव्हीडीयाचे समभाग सर्वाधिक 6 टक्के इतके घसरलेले पहायला मिळाले. याच्यासोबत मेटा, अॅमेझॉन, अल्फाबेट या दिग्गजांचे समभाग नुकसानीसह बंद झाले.

समभाग वधारलेल्या कंपन्या

  • हिरो मोटोकॉर्प    3772
  • बजाज फिनसर्व्ह  2005
  • इंडसइंड बँक      673
  • अदानी एन्टरप्रायझेस        2363
  • एचडीएफसी लाईफ         681
  • ट्रेंट                    5422
  • विप्रो                  272
  • अल्ट्राटेक सिमेंट 11599
  • एनटीपीसी          360
  • लार्सन टुब्रो         3501
  • पॉवरग्रीड कॉर्प    295
  • बजाज फायनान्स  9003
  • टाटा कंझ्युमर     973
  • ग्रासीम            2618
  • अदानी पोर्ट        1196
  • बीपीसीएल         276
  • एसबीआय          772
  • एचडीएफसी बँक  1825
  • ओएनजीसी         242
  • टायटन               3087
  • एशियन पेंट्स      2338
  • टेक महिंद्रा         1423
  • आयटीसी           409
  • कोल इंडिया       296
  • सिप्ला               1482
  • टीसीएस             3651
  • रिलायन्स            1278
  • भारत इले.          300
  • जेएसडल्ब्यू         1059
  • हिंडाल्को           693
  • इन्फोसिस           1603
  • एसबीआय लाईफ   1544
  • अॅक्सिस बँक       1098

समभाग घसरलेल्या कंपन्या

  • टाटा मोटर्स                 668
  • सनफार्मा                     1731
  • आयशर मोटर्स              5345
  • भारती एअरटेल              1724
  • कोटक महिंद्रा                2128
  • अपोलो हॉस्पिटल            6492
  • महिंद्रा आणि महिंद्रा         2733
  • टाटा स्टील                        155
  • डॉ. रे•ाrज लॅब्ज                1162
Advertisement
Tags :

.