For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअर बाजारात तिसऱ्या दिवशीही उत्साह

06:58 AM Feb 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेअर बाजारात तिसऱ्या दिवशीही उत्साह
Advertisement

सेन्सेक्स  283 अंकांनी तेजीसह बंद : आयटी पुन्हा दबावात

Advertisement

मुंबई :

भारतीय शेअरबाजारात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजीचा माहोल कायम राहिला होता. सेन्सेक्स यादरम्यान 283 अंकांनी वधारलेला दिसला तर मंगळवारी तेजीत असणारा आयटी निर्देशांक पुन्हा दबावात गेलेला पहायला मिळाला. रियल्टी, बँकिंग, मेटल, एफएमसीजी यांचे निर्देशांक मजबूत होत बंद झाले.

Advertisement

बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 283 अंकांच्या वधारासह 83734 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 93 अंकांनी वर चढत 25819 अंकांवर बंद होण्यात यशस्वी झाला. निफ्टी बँकेच्या निर्देशांकानेही मजबूत कामगिरी नोंदवली होती. सरतेशेवटी हा निर्देशांक 376 अंकांच्या तेजीसह 61550 अंकांवर बंद झाला होता. नकारात्मक कामगिरी आयटी निर्देशांकाने बुधवारी अनुभवली. हा निर्देशांक 406 अंक म्हणजेच जवळपास दीड टक्का इतका घसरणीसह 32668 च्या स्तरावर कार्यरत होता.

विविध निर्देशांकाच्या कामगिरीकडे पाहता आयटी व सीपीएसई हे निर्देशांक कमकुवत होत बंद झाले. तर ऑटो, कमोडिटीज, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, एफएमसीजी, इन्फ्रा, मेटल, ऑईल अँड गॅस, फार्मा, रियल्टी यांचे निर्देशांक तेजी दाखवत बंद झाले. यामध्ये सर्वाधिक चमकला तो एफएमसीजी, याने 628 अंकांची मजबूत तेजी नोंदवत 52406 अंकांवर बंद होण्यात यश मिळवले.

हे समभाग तेजीत

शेअरबाजारात पाहता बुधवारी एचडीएफसी लाइफ, टाटा स्टील, आयटीसी, टाटा कंझ्युमर, बजाज ऑटो, अॅक्सिस बँक, रिलायन्स, नेस्ले, एसबीआय, सिप्ला, सनफार्मा, इंडिगो, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, हिंडाल्को, एचयुएल, टायटन, ट्रेंट, श्रीराम फायनान्स, बीईएल, कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग वधारले होते.

हे समभाग घसरणीत

दुसरीकडे टेक महिंद्रा, इटर्नल, इन्फोसिस, अदानी पोर्टस्, एचसीएल टेक, टीसीएस, विप्रो, अदानी एंटरप्रायझेस, कोल इंडिया, एशियन पेंटस्, ओएनजीसी, डॉ. रे•िज लॅब्ज, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, आयशर मोटर्स, ऑईल इंडिया, केपीआयटी टेक., अरोबिंदो फार्मा, ओरॅकल फायनॅन्शीयल, आयजीएल यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले.

Advertisement
Tags :

.