महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विक्रमी प्रवासानंतर शेअरबाजारात नफा वसुली

07:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद : इन्फोसिसचे समभाग तेजीत

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी सुरुवातीची उच्चांकी कामगिरी प्राप्त केल्यानंतर बाजार अंतिम क्षणी घसरणीसह बंद झाला आहे. यात दिग्गज कंपन्यांपैकी इन्फोसिसचे समभाग मजबूत राहिले होते. नफा वसुलीच्या कारणास्तव बाजारात नकारात्मक वातावरण राहिले. यामध्ये सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने शुक्रवारी अंतिम सत्रात बीएसई सेन्सेक्स 738.81 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 80,604.65 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 269.95 अंकांसोबत निर्देशांक 24,530.90 वर बंद झाला आहे. पहिल्या तिमाहीचे अहवाल विविध कंपन्या सादर करत आहेत. यामध्ये शुक्रवारी इन्फोसिसने आपला तिमाही निकाल सादर केला असून कंपनीला मजबूत नफा झाला आहे. तसेच महसूलही वाढला असल्याची माहिती कंपनीने आपल्या अहवालामधून दिली आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग चमकल्याचे दिसून आले.

या समभागांमध्ये घसरण

शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, सनफार्मा आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्स, आयटीसी, नेस्ले आणि अदानी पोर्ट्स यांचे समभाग वधारले आहेत.

आयटी वगळता सर्व निर्देशांक घसरणीत

बाजारात आयटी निर्देशांक वगळता अन्य सर्व 12 निर्देशांकांमध्ये घसरणीची नोंद केली आहे. व्यापक पातळीवर देशात स्मॉलकॅप आणि मिडकॅप यांचे समभाग हे जवळपास 0.8 टक्क्यांनी प्रभावीत राहिले आहेत.

जागतिक बाजारांची स्थिती

आशिया प्रशांत क्षेत्रातील बाजारांमध्ये दुसऱ्या सत्रात आयटी क्षेत्रात दबाव राहिल्याने बाजारात घसरण राहिली असल्याचे पाहायला मिळाले आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article