कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेअरबाजारात परतली तेजी, आयटी कंपन्यांची साथ

07:00 AM Nov 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 513 अंकांनी मजबूत : बँक निर्देशांक उच्चांकावर

Advertisement

मुंबई : आयटी समभागांच्या खरेदीमुळे भारतीय शेअर बाजार बुधवारी दमदार तेजीसमवेत बंद झाला आहे. निफ्टी बँक निर्देशांकाने सर्वोच्च स्तर गाठला आहे. आयटी निर्देशांक 3 टक्के इतका दमदार तेजी दाखवत बंद झाला. सेन्सेक्सला मजबूत करण्यात एचसीएल टेक, इन्फोसिस, टीसीएस, एचयुएल व सनफार्मा यांचा मोठा वाटा होता. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 513 अंकांनी वाढत 85186 च्या स्तरावर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 142 अंकांनी वाढत 26052 अंकांवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांकाने पुन्हा बुधवारी नवी सर्वोच्च उंची गाठली होती. बँक निर्देशांक 316 अंकांनी मजबूत होत 59216 अंकांवर बंद झाला. बुधवारच्या सत्रात सर्वात फॉर्मात होता तो आयटी निर्देशांक होय. आयटी निर्देशांक 3 टक्के म्हणजे 1069 अंकांनी वाढत 37044 अंकांवर व्यवहार करत होता.

Advertisement

निफ्टी निर्देशांकात मॅक्स हेल्थकेअर, एचसीएल टेक, इन्फोसिस, विप्रो, टीसीएस, एचयुएल यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले तर तर दुसरीकडे टाटा मोटर्स पीव्ही, कोल इंडिया, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, हिंडाल्को, अदानी पोर्टस् यांचे समभाग मात्र घसरणीसोबत बंद झाले. मिडकॅप समभागांच्या कामगिरीकडे पाहिल्यास कोफोर्ज, पर्सिंस्टंट सिस्टम्स, भारत फोर्ज, पीबी फिनटेक यांचे समभाग तेजीत होते तर बायोकॉन, हुडको, एपीएल अपोलो ट्युब्ज, एमआरपीएल, भारत डायनॅमिक्स, एचपीसीएल यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले.  विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांच्या कामगिरीवर लक्ष दिल्यास ऑटो, फायनॅन्शीयल, एफएमसीजी, इन्फ्रा, आयटी, फार्मा यांचे निर्देशांक मजबूत होत बंद झाले. दुसरीकडे कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, मेटल व रियल्टी निर्देशांक मात्र कमकुवत होत बंद झाले. एकंदर पाहता दिवसभराच्या सत्रात शेअरबाजाराला दमदार तेजी देण्यात आयटी आणि बँक निर्देशांकांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. आशियाई बाजारात मिळताजुळता कल होता. जपानच्या निक्केई 0.67 टक्के वाढला होता तर हाँगकाँगचा हँगसेंग 0.09 टक्के वाढत बंद झाला. तर दक्षिण कोरीयाचा कोस्पी 0.46 टक्के घसरणीत होता.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article