For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धातू, आयटी समभागांमुळे शेअरबाजार दमदार तेजीत

06:12 AM Dec 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
धातू  आयटी समभागांमुळे शेअरबाजार दमदार तेजीत
Advertisement

सेन्सेक्स 638 अंकांनी तेजीत, 24 समभागांमध्ये मजबुती

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

जागतिक बाजारातील सकारात्मकता त्याचबरोबर धातू आणि आयटी समभागांच्या दमदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअरबाजार सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी दमदार मजबुतीसोबत बंद झाला. सेन्सेक्स 638 तर निफ्टी 206 अंकांनी तेजीत बंद झाला. श्रीराम फायनान्स व ट्रेंट हे निफ्टीमधले सर्वाधिक तेजीत राहिलेले समभाग होते.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 638 अंकांनी वधारत 85567 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 206 अंकांनी वाढत 26172 च्या स्तरावर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 24 समभाग तेजीत होते तर निफ्टीत 50 पैकी 39 समभाग मजबुतीसोबत बंद झाले.  बँक निफ्टी निर्देशांक 234 अंकांनी वाढत 59304 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांकांमध्ये 12 पैकी 9 समभाग वधारत बंद झाले. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 505 अंकांनी वाढत 60815 अंकांवर बंद झाला.

समभागांची कामगिरी

निफ्टीमध्ये श्रीराम फायनान्स, ट्रेंट, विप्रो, इन्फोसिस, भारती एअरटेल आणि टेक महिंद्रा यांचे समभाग तेजीत होते. तर दुसरीकडे एसबीआय, एचडीएफसी लाईफ, कोटक महिंद्रा बँक, टाटा कंझ्युमर, एसबीआय लाईफ आणि सिप्ला यांचे समभाग घसरणीत होते. मिडकॅप निर्देशांकात कोचिन शिपयार्ड, सोलार इंडस्ट्रीज, माझगाव डॉक, महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्सीयल आणि आरव्हीएनएल यांचे समभाग तेजीत तर डिक्सॉन टेक्नॉलॉजी, पतंजली फूड, टाटा कम्युनिकेशन, प्रेस्टीज इस्टेट यांचे समभाग घसरणीत राहिले.

क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी

विविध क्षेत्रांच्या निर्देशांकाचा विचार करता मेंटल ऑटो, एसएमसीजी आणि आयटी यांचे निर्देशांक सर्वाधिक तेजीत होते. सोबत कमोडिटीज, सीपीएसई, एनर्जी, फायनान्सीयल, इन्फ्रा,  फार्मा यांचे निर्देशांकही तेजीसमवेत बंद झाले.

Advertisement
Tags :

.