For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअरबाजारात तेजी

06:04 AM Apr 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअरबाजारात तेजी
Advertisement

सेन्सेक्स 639 अंकांनी तेजीत : ऑटो, फार्मा निर्देशांकांची मजबूत कामगिरी : कच्चे तेल 106 डॉलरवर

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

भारतीय शेअरबाजारात आठवड्याची सुरुवात चांगल्या तेजीने झालेली दिसून आली. ऑटो, फार्मा या दोन निर्देशांकातील समभागांची मोठी खरेदी केलेली पाहायला मिळाली.

Advertisement

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 639 अंकांनी वाढत 77303 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 194 अंकांनी वाढत 24092 अंकांवर बंद झाला. सोमवारी आयटी, बँक निफ्टी निर्देशांकही वाढत बंद झाले.

हे समभाग तेजीत

शेअरबाजारात सनफार्मा, जियो फायनॅन्शीयल, रिलायन्स, विप्रो, टेक महिंद्रा, अदानी पोर्टस, एसबीआय लाइफ, जेएसडब्ल्यू स्टील, टीसीएस, महिंद्रा आणि महिंद्रा, सिप्ला, कोटक महिंद्रा बँक, हिंडाल्को, अपोलो हॉस्पिटल, आयशर मोटर्स, आयटीसी, टायटन, ओएनजीसी, भारती एअरटेल, लार्सन टुब्रो, बजाज ऑटो, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंटस्, इंडिगो, टाटा मोटर्स पीव्ही यांचे समभाग मजबुतीसोबत बंद झाले.

हे समभाग घसरणीत

घसरणीत पाहता नेस्ले इंडिया, इटर्नल, श्रीराम फायनान्स, बीईएल, अॅक्सिस बँक, टाटा कंझ्युमर्स, आयसीआयसीआय बँक, कोल इंडिया, ट्रेंट यांचे समभाग होते.

विविध निर्देशांकांची कामगिरी पाहता फार्मा, रियल्टी व आयटी निर्देशांक मजबूतीसोबत बंद झाले. मेटल, एनर्जी, ऑटो, पीएसई या निर्देशांकातील समभागांनीही तेजी राखली होती.

जागतिक बाजारातले चित्र

जागतिक बाजारात आशियाई बाजारात मिळताजुळता कल होता. दक्षिण कोरीयाचा कोस्पी निर्देशांक 2.15 टक्के तेजीत होता. जपानचा निक्केई 1.38 टक्के इतका तेजीत होता. हाँगकाँगचा हँगसेंग 0.20 टक्के इतका घसरणीत होता. 24 एप्रिलला अमेरिकेतील बाजारात डोव्ह जोन्स 0.16 टक्के घसरणीत होता. नॅसडॅक 1.63 टक्के व एस अँड पी 500 निर्देशांक 0.80 टक्के तेजीसह बंद झाला होता.

कच्च्या तेलाच्या किमतीत वधार

याचदरम्यान अमेरिका व इराण यांच्यातील तणावाने कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ नोंदवली आहे. कच्च्या तेलाचे दर 106 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. बाजारात तेलाची मागणी मजबूत असून होर्मुझची चिंता अद्यापही कायम आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.

शुक्रवारी बाजारात होती घसरण

शुक्रवारी शेअरबाजारात घसरण अनुभवायला मिळाली होती. 24 एप्रिलला सेन्सेक्स 1000 अंकांनी तर निफ्टी 275 अंकांनी घसरणीत राहिला होता.

Advertisement
Tags :

.