For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागतिक दबावात शुक्रवारी शेअरबाजारात मोठी घसरण

06:35 AM Mar 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
जागतिक दबावात शुक्रवारी शेअरबाजारात मोठी घसरण
Advertisement

सेन्सेक्स 1600 अंकांनी कोसळला, बँक, ऑटो निर्देशांक घसरला

Advertisement

मुंबई:

सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर शुक्रवारी अखेरच्या दिवशी जागतिक तणावाच्या वाढत्या स्थितीमुळे शेअर बाजारात मोठी घसरण अनुभवायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे 1690 आणि 486 अंकांनी घसरणीत राहिले होते. ऑटो आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या कमकुवत कामगिरीमुळे देखील बाजारात घसरण पाहायला मिळाली.

Advertisement

शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1690 अंकांनी कोसळून 73,583 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 486 अंकांनी घसरून 22,819 अंकांवर बंद झाला. यासोबत बँक निफ्टी निर्देशांक सुद्धा 1433 अंकांनी कोसळून 52,274 अंकांवर बंद झाला. विविध समभागांच्या कामगिरीमध्ये पाहता ओएनजीसी, विप्रो, एनटीपीसी, भारती एअरटेल, टीसीएस, कोल इंडिया, पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग तेजीत होते. निफ्टी पीएसयु बँकेचा निर्देशांक सर्वाधिक प्रभावित होता. यामध्ये कॅनरा बँक यांचे समभाग तीन टक्के घसरणीत होते. टाटा मोटर्स पीव्हीचा समभाग तसेच श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी लाइफ यांचे समभाग घसरणीत राहिले होते.

या आधीच्या 24 मार्च व 25 मार्च रोजीच्या शेअर बाजाराच्या सत्रात साडेतीन टक्के इतकी तेजी पाहायला मिळाली होती. मात्र 27 रोजी गुंतवणूकदारांनी नफा वसुलीवर भर दिलेला दिसून आला.

अमेरिकेने हल्ले थांबवलेले असले तरी तर इराण मात्र आता माघारी घ्यायला तयार नाही. याच दरम्यान जागतिक बाजारामध्ये सुद्धा घसरणीचा सिलसिला पाहायला मिळाला. 26 मार्च रोजी अमेरिकेतील बाजार दोन टक्के इतके घसरले होते. कच्चे ब्रेंट व्रुड तेल 107 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते.

भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत नीचांकी स्तरावर म्हणजेच 94 वर पोहोचल्याने त्यानेही बाजाराचा मूड बिघडवून टाकला. याच दरम्यान विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीवर भर दिला जात असल्याने शेअर बाजारातला दबाव काही कमी व्हायला तयार नाही. बाजारामध्ये दक्षिण कोरियाचा कोस्पी 2.17 टक्के घसरला होता.

Advertisement
Tags :

.