For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेअर बाजारात हजारहून अधिक अंकांची पडझड

07:00 AM Feb 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेअर बाजारात हजारहून अधिक अंकांची पडझड
Advertisement

सेन्सेक्स 1236 अंकांनी कोसळला : अमेरिका-इराण संघर्षाचा परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

सलग तीन दिवसांच्या तेजीत असणाऱ्या भारतीय शेअरबाजाराने गुरुवारी मोठी घसरण अनुभवली. अमेरिका-इराण युद्धाचे सावट व इतर कारणांमुळे शेअरबाजारात घसरण दिसून आली. कच्च्या तेलाच्या किमती वाढीसोबत बँकांच्या समभागातील दबावाने बाजाराला आणखी कमकुवत करुन टाकले. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1236 अंकांनी कोसळत 82498 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 365 अंकांच्या घसरणीसोबत 25454 अंकांवर बंद झाला. निफ्टीत 50 समभागांमध्ये 46 समभाग घसरणीत होते. या घसरणीत कंपन्यांचे बाजार भांडवल 47,174,876.86 कोटी रुपयांवरुन  4,64,43,943.53 कोटी रुपयांवर घसरले. 7.30 लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांचे स्वाहा झाले.

Advertisement

याचदरम्यान वोलॅटिलीटी निर्देशांक इंडिया व्हीआयएक्स 9 टक्के तेजीत होता, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती अधिक बळावली. मिडकॅप निर्देशांक 1 हजार अंक घसरत 59,228 अंकांवर तर बँक निफ्टीही जवळपास 811 अंकांनी कोसळत 60740 अंकांवर स्थिरावल्याचे दिसून आले. विविध क्षेत्राच्या निर्देशांकांचा विचार करता सर्व लाल निशाण्यासह बंद झाले. सर्वाधिक घसरण ही रियल्टीत दिसली. आयटी क्षेत्र सुरुवातीला तेजीत होता पण ही तेजी टीकू शकली नाही. निर्देशांकातील पर्सिस्टंट सिस्टमचा समभाग 6 टक्के घसरला होता. डिक्सन टेकचा समभाग 2 टक्के घसरला होता. याचदरम्यान बाजारात तेल कंपन्या ओएनजीसी, ऑईल इंडिया यांचे समभाग 5 टक्केपर्यंत वाढलेले पाहायला मिळाले. ब्रेंट कच्च्या तेलाचे भाव 5 टक्के इतके वाढत 71 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. एकंदरच बाजारात विक्रीचा मारा दिसून आला.

बाजार घसरण्याची कारणे

तीन दिवसांच्या तेजीनंतर गुंतवणूकदारांनी गुरुवारी नफावसुलीवर भर दिला होता. मिडकॅप, स्मॉलकॅप समभागांमध्ये दबाव होता. याने बाजाराचा मूड ऑफ झाला. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती एकदम उसळल्या. यामुळे बाजारावर अतिरीक्त दबाव उत्पन्न केला. अस्थिरता निर्देशांक इंडिया व्हीआयएक्स गुरुवारी 8 टक्के वाढत 13.21 वर पोहचला होता. हा वाढत्या अस्थिरतेचे संकेत व्यक्त करत असतो. एफ अँड ओ एक्सपायरीमुळेही बाजारात चढउतार दिसला. दुसरीकडे बँकिंग समभागांवर दबाव दिसला होता. कोटक महिंद्रा, अॅक्सिस बँक व इंडसइंड बँक यांचे समभाग 1 टक्का ते 1.8 टक्का इतके घसरले. निफ्टी बँक निर्देशांक 61 हजारच्या खाली आला.

समभाग वधारलेल्या कंपन्या

  • ओएनजीसी         274
  • हिंडाल्को           905
  • एचडीएफसी लाईफ 733
  • डिव्हीस लॅब        6286
  • ल्यूपिन               2224

समभाग घसरलेल्या कंपन्या

  • इंटरग्लोब एव्ही    4818
  • ट्रेन्ट                    4065
  • अल्ट्राटेक सिमेंट  12669
  • महिंद्रा-महिंद्रा     3425
  • भारत इले.          435
  • अदानी पोर्ट        1512
  • कोटक महिंद्रा     416
  • रिलायन्स इंडस्ट्रीज  1410
  • आयटीसी           325
  • पॉवरग्रिड कॉर्प    294
  • इटर्नल                 271
  • हिंदुस्थान युनि     2279
  • मारुती सुझुकी    14904
  • टाटा स्टील         205
  • भारती एअरटेल   1990
  • अॅक्सिस बँक       1355
  • टेक महिंद्रा         1480
  • एनटीपीसी          363
  • बजाज फायनान्स 2037
  • एशियन पेन्ट्स     2401
  • आयसीआयसीआय  1390
  • टायटन               4201
  • एचसीएल टेक     1450
  • लार्सन अॅण्ड टुब्रो 4278
  • स्टेट बँक            1207
  • बजाज फायनान्स 1014
  • एचडीएफसी बँक 916
  • सनफार्मा            1710
  • टीसीएस             2680
  • इन्फोसिस           1369
  • इंडियन हॉटेल्स    672
  • हिरोमोटो           5412
  • पॉवर फायनान्स  409
  • पीबी फिनटेक     1466
  • मॅरिको               778
  • अंबुजा सिमेंट      511
Advertisement
Tags :

.