सलग तिसऱ्या दिवशी शेअरबाजार तेजीत
सेन्सेक्स 221 अंकांनी तेजीत, मेटल निर्देशांकाची चमक कायम
वृत्तसंस्था/मुंबई
जागतिक राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आर्थिक सर्वेक्षण 2026च्या अंतर्गत भारताचा विकास हा चांगला राहणार असल्याचे संकेत व्यक्त केल्याने भारतीय शेअर बाजारात गुरुवारीही तेजी कायम राहिली. सलग तिसऱ्या सत्रामध्ये शेअरबाजार तेजीसमवेत कार्यरत होता. मेटल निर्देशांकाने तेजीचा सिलसिला कायम ठेवला असला तरी गुरुवारी ऑटो आणि आयटी समभागांनी मात्र निराशादायी कामगिरी केली.
गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 221 अंकांनी वाढत 82566च्या स्तरावर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 76 अंकांच्या वाढीसह 25418 वर बंद झाला. सेन्सेक्समध्ये पाहता 30 पैकी 16 घसरणीत होते तर निफ्टी निर्देशांकात 50 पैकी 26 समभागांची कामगिरी निराशाजनक राहिली. बँक निफ्टी निर्देशांक 359 अंकांनी वाढत 59957 अंकांवर बंद झाला.
समभागांची कामगिरी
शेअरबाजारात गुरुवारी टाटा स्टील, लार्सन टूब्रो, इटर्नल, टाटा मोटर्स, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, कोल इंडिया, बजाज ऑटो, हिंडाल्को, ओएनजीसी, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी एंटरप्रायझेस, एचडीएफसी बँक, पॉवरग्रीड कॉर्प, विप्रो आणि एसबीआय यांचे समभाग मजबुतीसोबत बंद झाले. मिडकॅप निर्देशांकात एमआरपीएल, एनएलसी इंडिया, ऑईल इंडिया, इंडस् टॉवर्स, एनएमडीसी व मुथ्थुट फायनान्स यांचे समभाग तेजीत राहिले होते. दुसरीकडे एचडीएफसी लाईफ, ग्रासीम, रिलायन्स, आयशर मोटर्स, सिप्ला, मॅक्स हेल्थकेअर, आयटीसी, टीसीएस, सनफार्मा, टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुती सुझुकी, महिंद्रा आणि महिंद्रा, इन्फोसिस, बीईएल यांचे समभाग घसरणीत होते. मिडकॅप निर्देशांकात केपीआयटी टेक, सोलार इंडस्ट्रीज, एमआरएफ, भारत डायनॉमिक्स आणि एसजेव्हीएन यांचे समभाग कमकुवत होत बंद झाले.
क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी
क्षेत्रांच्या निर्देशांकांची कामगिरी पाहता चार निर्देशांक घसरणीत राहिले. यामध्ये ऑटो, एफएमसीजी, आयटी आणि फार्मा या निर्देशांकांचा समभाग होता. दुसरीकडे कमोडीटीज, सीपीएसपीई एनर्जी, फायनान्सीयल्स, इन्फ्रा, रियल्टी, मेटल आणि ऑईल अँड गॅस निर्देशांक तेजीसोबत बंद झाले.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टाटा स्टील 202
- लार्सन टुब्रो 3938
- अॅक्सिस बँक 1364
- टाटा मोटर्स पीव्ही 352
- एनटीपीसी 358
- इटर्नल 274
- हिंडाल्को 1027
- अदानी पोर्टस 1417
- कोल इंडिया 455
- ओएनजीसी 274
- जेएसडब्ल्यू स्टील 1242
- आयसीआयसीआय 1385
- विप्रो 240
- अदानी एंटरप्रायझेस 2016
- बजाज ऑटो 9512
- भारती एअरटेल 1969
- पॉवरग्रिड कॉर्प 260
- बजाज फिनसर्व्ह 1947
- एसबीआय 1067
- श्रीराम फायनान्स 1022
- अंबुजा सिमेंट 536
- सोनाटा 316
- बीपीसीएल 366
- पीएनबी 125
- नायका 237
- आयडीएफसी फर्स्ट 83
- पीएफसी 386
समभाग घसरलेल्या कंपन्या
- एशियन पेंटस् 2415
- इंडिगो 4820
- एसबीआय लाइफ 1998
- मारुती सुझुकी 14484
- टाटा कंझ्युमर 1103
- टीसीएस 3139
- महिंद्रा आणि महिंद्रा 3388
- बीइएल 445
- हिंदुस्थान युनिलिव्हर 2345
- सनफार्मा 1590
- डॉ. रे•िज लॅब्ज 1209
- ट्रेंट 3825
- अपोलो हॉस्पिटल 6810
- मॅक्स हेल्थकेअर 951