For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सलग पाचव्या सत्रात शेअर बाजार तेजीवर स्वार

06:11 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
सलग पाचव्या सत्रात शेअर बाजार तेजीवर स्वार
Advertisement

सेन्सेक्स 383 अंकांनी तर निफ्टी 149 अंकांनी वधारत बंद 

Advertisement

बुधवारी भारतीय शेअर बाजार सलग पाचव्या सत्रामध्ये तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला आहे. बाजारामध्ये आयटी समभाग मात्र कमकुवत झालेले दिसून आले. बुधवारच्या सत्रात सेन्सेक्स 383 अंकांनी आणि निफ्टी 149 अंकांनी वाढत बंद झाला.

त. भा. वृत्तसंस्था

Advertisement

मुंबई : आयटी निर्देशांक वगळता इतर सर्व निर्देशांक तेजीसह बंद झाले. यामध्ये मीडिया निर्देशांक सर्वाधिक पाच टक्के तेजीसोबत बंद होताना दिसला. बाजाराला महत्त्वाचा आधार देताना मेटल आणि रियल्टी या निर्देशांकांनी प्रत्येकी 2 टक्के वाढ दर्शविली होती. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 383 अंकांनी वाढत 77301 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 149 अंकांनी वाढत 23960 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 373 अंकांनी वाढत 55913 अंकांवर बंद झाला होता. आयटी निर्देशांक मात्र नकारात्मक कामगिरी करत बंद झाला. हा निर्देशांक 489 अंकांनी घसरत 32061 च्या स्तरावर बंद झाला.

निफ्टीमध्ये 50 पैकी 36 समभाग तेजीसमवेत बंद झाले. यामध्ये बीईएल, अदानी एंटरप्रायझेस, टायटन यांचे समभाग सुमारे 4 टक्के वधारत बंद झाले तर दुसरीकडे टीसीएस, बीएसई, एचसीएल टेक यांचे समभाग 2 टक्क्यांपर्यंत घसरणीत राहिले होते. या व्यतिरिक्त जिओ फायनान्शियल, मॅक्स हेल्थकेअर, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स, टाटा स्टील, ट्रेंट, एचयुएल, बजाज ऑटो, सनफार्मा, रिलायन्स, सिप्ला, पॉवरग्रीड कॉर्प, डॉ. रे•ाrज लॅब्ज यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. दुसरीकडे घसरणीत पाहता लार्सन टुब्रो, कोटक महिंद्रा, इन्फोसीस, कोल इंडिया, टाटा कंझ्युमर, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, आयशर मोटर्स, सुंदरम फायनान्स, बँक ऑफ महाराष्ट्र, सोलार इंडस्ट्रीज यांचा समावेश होता.

बाजारामध्ये विविध क्षेत्रातील निर्देशांकांची कामगिरी पाहिल्यास ऑटो, कमोडीटी, सीपीएसई, एनर्जी, फायनान्शियल्स, एफएमसीजी, इन्फ्रा, मेटल, ऑईल व गॅस, फार्मा व रियल्टी यांचे निर्देशांक तेजीसोबत बंद झाले. यामध्ये देखील एनर्जी निर्देशांक सर्वाधिक 788 अंकांच्या वाढीसोबत 37078 अंकांवर बंद होताना दिसला. कच्च्या तेलाच्या किंमती बुधवारी जवळपास 1 टक्क्यांच्या जवळपास घसरत 102 डॉलर प्रतिबॅरलवर आल्या होत्या.

Advertisement
Tags :

.