For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शुल्क आकारणीची शेअरबाजाराला धास्ती

06:58 AM Apr 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
शुल्क आकारणीची शेअरबाजाराला धास्ती
Advertisement

बाजारातील गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक पुन्हा कोसळले आहेत. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क लागू करण्याच्या नव्या प्रस्तावामुळे भारतीय बाजाराने पुन्हा धास्ती घेतली असल्याचे शुक्रवारी दिसून आले. यामुळे आगामी काळात जगभरात व्यापार युद्धाचा भडका होण्याचे तर्कवितर्कही आर्थिक क्षेत्रातील अभ्यासक मांडत असून या सर्वांचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात होत आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स अंतिम क्षणी 930.67 अंकाच्या घसरणीसह निर्देशांक 75,364.69 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 345.65 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 22,904.45 वर बंद झाला आहे.

Advertisement

विविध क्षेत्रांपैकी निफ्टीमधील धातू, वाहन, आयटी आणि औwषध आदी क्षेत्रांचा निर्देशांकात जवळपास 2.17 टक्क्यांची घसरण राहिली आहे. दरम्यान बँक आणि आर्थिक सेवा देणाऱ्या कंपन्यांचे निर्देशांक मात्र तेजीत कार्यरत राहिले होते.

10 लाख कोटींचा फटका

शेअर बाजारातील घसरणीमुळे याचा फटका हा गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांचे बाजारमूल्य शुक्रवारी घटून 4,03,83,671 कोटी रुपयावर आले आहे. हा आकडा गुरुवारी 414,16,218 कोटी रुपये राहिला होता. मात्र दरम्यान गुंतवणूकदारांचे 10,32,547 कोटी रुपये बुडाले असल्याची माहिती आहे.

घसरणीची मुख्य कारणे :

  1. भारतीय बाजारातील मुख्य कारण म्हणजे, अमेरिकेकडून औषध क्षेत्राला शुल्क आकारणीचे संकेत आहेत.
  2. निर्देशांकांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग हे बीएसईमध्ये 4 टक्क्यांनी प्रभावीत होत निर्देशांकाने 1,195.75 इतका नीच्चांक प्राप्त केला आहे.
Advertisement

.