For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नफावसुलीने गुरुवारी शेअरबाजारात घसरण

07:00 AM Sep 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
नफावसुलीने गुरुवारी शेअरबाजारात घसरण
Advertisement

सेन्सेक्स 417 अंकांनी घसरणीत, निफ्टीही 47 अंकांनी नुकसानीत, रुपया वधारला

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

नफावसुलीमुळे भारतीय शेअर बाजार गुरुवारी पुन्हा घसरणीसोबत बंद होताना दिसला. सेन्सेक्स 417 अंकांनी तर निफ्टीदेखील 47 अंकांनी घसरलेला होता. बँक निर्देशांक तेजीत होता. विविध क्षेत्रांच्या कामगिरीकडे पाहता रियल्टी, केमिकल समभाग मजबूत होत बंद झाले. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 417 अंकांनी घसरत 76152 च्या स्तरावर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 47 अंकांनी घसरत 23873 अंकांवर बंद झाला. मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांक मात्र तेजीसह बंद झाले होते. निफ्टी बँक निर्देशांक 208 अंकांनी वधारत 57380 च्या स्तरावर बंद झाला. ब्रेंट व्रुड कच्चे तेल आंतरराष्ट्रीय बाजारात 96 डॉलरवर पोहचले होते. डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी सर्वाधिक मजबूत होत खुला झाला होता.

Advertisement

विविध क्षेत्रांची कामगिरी

निफ्टीतील ऑटो, कमोडिटीज, एफएमसीजी, इन्फ्रा, आयटी, ऑइल व गॅस तसेच फार्मा यांचे निर्देशांक दबावासह बंद होताना दिसले. तर दुसरीकडे सीपीएसई, एनर्जी, फायनॅन्शीयल्स, मेटल व रियल्टी या निर्देशांकांनी बाजाराला सावरण्यासाठी आधार देण्याचे काम केले. यातही आयटी निर्देशांक 264 अंकांनी घसरत 30838 अंकांवर बंद झाला तर एफएमसीजी 284 अंकांनी घसरत 45955 अंकांवर बंद झाला होता. बीएसईवर 2769 समभाग तेजीत होते तर एनएसईवर पाहता 2046 समभाग तेजीत होते.

निफ्टी स्मॉलकॅप 100 1.20 टक्के वाढत तर निफ्टी मिडकॅप 100 0.37 टक्के वाढत बंद झाला. निफ्टीत पाहता अदानी पोर्टस्चा समभाग सर्वाधिक तेजीत होता. जो 2.03 टक्के वाढला होता. यानंतर अॅक्सिस बँक 1.05 टक्के, एचडीएफसी बँक 0.84 टक्के, टाटा कंझ्युमर 0.72 टक्के व भारत इलेक्ट्रॉनिक्स 0.71 टक्के वाढत बंद झाले. नुकसानीत पाहता बजाज ऑटो सर्वाधिक प्रभावीत राहिला. हा समभाग 1.74 टक्के घसरत बंद झाला. यापाठोपाठ टेक महिंद्रा 1.55 टक्के, ट्रेंट 1.29 टक्के, सिप्ला 1.29 टक्के व महिंद्रा आणि महिंद्रा 1.26 टक्के घसरत बंद झाले.

आशियाई बाजारात घसरण

जागतिक बाजारात पाहता आशियाई बाजारात नरमाई होती. दक्षिण कोरीयाचा कोस्पी 0.26 टक्के तेजीत होता. जपानचा निक्केई 0.17 टक्के व हाँगकाँगचा हँगसेंग 0.39 टक्के इतका घसरत बंद झाला. 2 सप्टेंबरला अमेरिकेतील बाजारात घसरण दिसून आली होती.

  • अॅक्सिस बँक    1266
  • अदानी पोर्ट      1686
  • एशियन पेन्ट्स  2540
  • एचडीएफसी बँक          704
  • भारती एअरटेल            1865
  • भारत इले.       405
  • टाटा स्टील       183
  • श्री सिमेंट         24000
  • डीएलएफ        681
  • ब्रिटानिया         5199
  • हिंडाल्को         1016
  • हॅवेल्स इंडिया   1200
  • बीपीसीएल       319
  • टाटा पॉवर       365
  • जिओ फायनान्स   237
  • कोल इंडिया     419
  • जेएसडब्लू स्टील  1309
  • अंबुजा सिमेंट   403

  • टायटन                          4960
  • ट्रेन्ट                              2807
  • आयटीसी                       262
  • महिंद्रा अॅण्ड महिंद्रा       3140
  • बजाज फिनसर्व्ह           1958
  • एचसीएल टेक               1310
  • टेक महिंद्रा                   1597
  • सनफार्मा                      1904
  • टीसीएस                       2312
  • अल्ट्राटेक सिमेंट           11223
  • बजाज फायनान्स          1045
  • कोटक महिंद्रा               420
  • मारुती सुझुकी              12705
  • इंटरग्लोब एव्ही.             4952
  • हिंदुस्थान युनि.              1956
  • इन्फोसिस                    1128
  • पॉवरग्रिड कॉर्प              265
  • रिलायन्स इंडस्ट्रीज        1301
  • लार्सन अॅण्ड टुब्रो          3965
  • स्टेट बँक                      1017
  • आयसीआयसीआय        1425
  • एनटीपीसी                      329
Advertisement
Tags :

.