जागतिक अस्थिरतेत शेअरबाजार पहिल्या दिवशी घसरणीत
सेन्सेक्स 547 अंकांनी नुकसानीत, निफ्टीही 157 अंकांनी घसरला, कच्चे तेल वधारले
वृत्तसंस्था, मुंबई
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मोठ्या प्रमाणात विक्रीवर भर दिला गेल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले. जागतिक अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ व इतर कारणांचा परिणाम शेअरबाजारावर दिसला. सेन्सेक्स 547 अंकांनी तर निफ्टी 157 अंकांच्या घसरणीसोबत बंद झाला होता.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 547 अंकांनी घसरून 71,924 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे 50 समभागांचा राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टीही 157 अंकांनी कमकुवत होत 22,363 अंकांवर बंद झाला. दिवसभर लार्ज-कॅप शेअर्समध्ये नफावसुलीचा दबाव कायम राहिल्याने बाजारात घसरण होती. सोमवारी पाहता निफ्टी एफएमसीजी निर्देशांकाला सर्वाधिक फटका बसला. निफ्टी एफएमसीजी निर्देशांक 1.67 टक्क्यांनी घसरून बंद झाला. याव्यतिरिक्त निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकातही लक्षणीय घसरण झाली आणि तो 1.18 टक्केसह घसरला होता. आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये दबावाचे वातावरण दिसून आले. निफ्टी मेटल निर्देशांक 0.41 टक्के इतका घसरला होता. या सर्व क्षेत्रांमधील मंदीमुळे प्रमुख निर्देशांकांवर दबाव वाढत गेला. याचदरम्यान गुंतवणूकदारांनी मीडिया, ऑटोमोबाईल आणि फार्मास्युटिकल क्षेत्रातील समभागांची खरेदी करण्यावर भर दिला होता. ऑटोमोबाईल क्षेत्रातील निफ्टी ऑटो निर्देशांक 0.90 टक्के इतका वाढीसह बंद झाला होता. निफ्टी फार्मा निर्देशांक 0.45 टक्केच्या वाढीसह बंद झाला. दिवसभर स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. कमोडिटीज, सीपीएसई, इन्फ्रा, ऑईल व गॅस यांचेही निर्देशांक कमकुवत कामगिरी करत बंद झाले. एनर्जी व रियल्टी यांचे निर्देशांक तेजीत होते.
समभागांची कामगिरी
तेजीत सोमवारी कमी कंपन्यांचे समभाग होते. डॉ. रे•िज लॅब्ज, बजाज ऑटो, टाटा मोटर्स पीव्ही, बीईएल, बीएसई, आयशर मोटर्स, सिप्ला, महिंद्रा आणि महिंद्रा, कोटक बँक, एचसीएल टेक, एचडीएफसी लाइफ, जेएसडब्ल्यू स्टील, सनफार्मा यांचे समभाग मजबूत होत बंद झाले. पॉवरग्रिड कॉर्प, इटर्नल, ट्रेंट, एसबीआय लाइफ, टायटन, जियो फायनान्स, अॅक्सिस बँक, ओएनजीसी, मारुती सुझुकी, लार्सन टुब्रो, भारती एअरटेल, कोल इंडिया, एसबीआय, आयसीआयसीआय बँक. श्रीराम फायनान्स, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, अपोलो हॉस्पिटल, मॅक्स हेल्थकेअर, हिंडाल्को, एनटीपीसी, ग्रासिम, एचयुएल, अदानी पोर्ट, एशियन पेंटस् यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले.